घरलाईफस्टाईललाल मिरचीची चटणी

लाल मिरचीची चटणी

Subscribe

स्वादिष्ट लाल मिरचीची चटणी

दररोज डब्याला काय द्यावे, असा अनेकदा गृहिणींना प्रश्न पडतो. तसेच दररोज भाजी खाऊन देखील कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट लाल मिरचीची चटणी बनवू शकता.

साहित्य

  • आवश्यकतेनुसार लाल मिरची
  • १०/१२ लसूण
  • गरजेनुसार आल्याचे तुकडे
  • १ चमचा लिंबू रस
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती

सर्वप्रथम आले आणि मिरच्या चिरुन घ्याव्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे परतून घ्यावे. नंतर पॅनमध्ये आल्याचे काप आणि लसणाच्या १२ ते १४ पाकळ्या देखील टाका. सर्व समाग्री चांगली परतून घ्या. त्यानंतर त्यात लाल मिरच्या चांगल्या परतवून त्यात मीठ आणि हळद टाकून चांगले ढवळून घ्याव्या. सर्व शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि नंतर हे सारे मिश्रण मिक्सरला लावून बारीक करुन घ्या. नंतर एका भांड्यात काढून थंड करा, अशाप्रकारे घरच्या घरी चटणी तयार करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -