घरलाईफस्टाईलकिचन टिप्स

किचन टिप्स

Subscribe

* ब्रेडक्रम्प्स असेच बनवले तर ते मऊ होतात, त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हनमध्ये घालून कडक करावेत आणि मग ब्रेडक्रम्प्स बनवावेत. बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात.

* चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे. त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते.

- Advertisement -

* कुकरची रबरी रींग फ्रिजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रिजरमधे १५ मिनिटे ठेवावी, यामुळे रींग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते.

* लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभरसुद्धा ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते.

- Advertisement -

* आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करावेत त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवल्यास आठवडाभर छान टिकते.

* हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो.

* टोमॅटो प्युरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर पाच मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रिजमध्ये ठेवावे. ७-८ दिवस झकास टिकते. (व्हिनेगर नसल्यास टोमटोची ही प्युरी फ्रिजरमध्ये हवाबंद डब्यात ठेवावी)

* मिक्सरच्या ग्राइन्डरमध्ये वेलदोड्यांची पावडर करताना कितीही फिरवला तरी बारिक होत नाही,म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतून फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइन्डरमध्ये फिरवले तर त्यांची पटकन बारिक पावडर होते व वासही छान येतो.

* बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून ५ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. मध्ये एकदा उलट-पालट करायचे. (खालची बाजूवर). मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. गार झाले की सालं पटकन काढता येतात.

* बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.

* बेसन व रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या १/३ तुपात मायक्रोमध्ये भाजता येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -