घरलाईफस्टाईलनेलपेंट सुकविण्याच्या खास टिप्स

नेलपेंट सुकविण्याच्या खास टिप्स

Subscribe

ऐनवेळी नेलपेंट लावून ते झटपट सुकवणं म्हणजे कठीणच अशावेळी तयार व्हावं, की नेलपेंट सुकवत बसावं..? काही मिनिटांत सुकवून देणा-या या खास युक्त्या

महिला वर्गात लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत नेलपेंट किंवा नेलपॉलिश लावणे ही आवडीची गोष्ट असते. आजकाल तर नेल आर्ट नावाने विविध डिझाईन्स नखांवर नेलपेंटच्या साहाय्याने काढण्याचा ट्रेंडही लोकप्रिय आहे. सणासमारंभात हातावर मेहेंदी तसेच नखांवर नेलपॉलिश आवर्जून काढली जाते. नेलपेंट लावताना ती काळजीपुर्वक लावली जाते. ती ओली असताना कशाचा ही धक्का लागला की, नेलपेंट खराब होऊन जाते. याकरिता कुठलीही हालचाल न करता नेलपेंट सुकण्याची वाट पाहात बसावं लागतं. त्यात जर कधी घाईत असू, तर ऐनवेळी नेलपेंट लावून ते झटपट सुकवणं म्हणजे कठीणच अशावेळी तयार व्हावं, की नेलपेंट सुकवत बसावं..? काही मिनिटांत सुकवून देणा-या या खास युक्त्या-

टिप्स – 

  • कुकिंग स्प्रेचा वापर करुन नेलपेंट सुकवता येतं, यावर खरतर विश्वास बसणं कठीण आहे. नेलपेंट लावलेल्या बोटांवर कुकिंग स्प्रे हलकेच फवारावा. ५ ते ६ मिनिटे बोटे तशीच ठेवावीत व नंतर साबणाच्या साहाय्याने हात स्वच्छ धुवून घ्यावा.
  • घाईच्या वेळी बाजारात उपलब्ध असणा-या झटपट सुकणा-या नेलपेंट वापरणं उपयुक्त ठरेल. अशी नेलपेंट सुकायला फार वेळ लावत नाहीत. कुठलेही जास्तीचे प्रयत्न न करता, अवघ्या काही मिनिटांत हे नेलपेंट सुकतात.
  • नेलपॉलिशचा एक कोट लावण्यापेक्षा डबल कोट लावणं सुंदर दिसत असलं किंवा अधिक काळ टिकून राहत असलं, तरी घाईगडबडीत असताना नेलपॉलिश पटकन सुकावं म्हणून थोडा कामचलाऊपणा करायला काय हरकत आहे? अशावेळी, नेलपॉलिशचा एक पातळ कोट लावणे सोयीचे ठरते.
  • कमी वेळात नेलपेंट सुकवायचं असेल तर थेट फ्रिजरची मदत घ्यावी लागते. यासाठी पंजा काही मिनिटे फ्रिजरमधील बर्फावर ठेवावा. नेलपेंट अवघ्या काही मिनिटांत सुकेल.
  • जर तुमच्याकडे युव्ही किंवा एलईडी लाईट्स असणारं नेल ड्रायर असेल. आकाराने लहान असणारं हे ड्रायर, कुठेही सहज कॅरी करता येत. परवडणा-या दरात असल्याने घरात एक नेल ड्रायर असणं सोयीचं ठरतं.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -