घरमहाराष्ट्रतीन वेगवेगळ्या अपघातामध्ये ८ जणांचा दुर्देवी मृत्यू

तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये ८ जणांचा दुर्देवी मृत्यू

Subscribe

अपघाताची पहिली घटना जुन्नर येथे तर दुसरी घटना नागपूर येथे घडली आहे. या अपघातानंतर दोन्ही गाडी चालक फरार झाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये आज सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले. या अपगातामध्ये ८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांनी चिरडल्यामुळे ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची पहिली घटना जुन्नर येथे तर दुसरी घटना नागपूर आणि तिसरी घटना जालन्यामध्ये घडली आहे. या अपघातानंतर गाडी चालक फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मृत्यू 

नगर – कल्याण महामार्गावर उदापुरजवळ मॉर्निंग वॉकला निघालेल्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले. जुन्नर तालुक्यातील उदापुर गावातील तीन वृद्ध महिलांचा या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला. मृतामध्ये मीराबाई ढमाले (६० वर्ष), कमल ढमाले (६२ वर्ष), चांगुणा रायकर (७० वर्ष) या जेष्ठ महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत महिलांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवले आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.

- Advertisement -

दूध आणण्यासाठी गेले असता मृत्यू 

तर दुसरी अपघाताची घटना नागपूर येथे घडली आहे. नागपूरमध्ये दोन सख्ख्या बहिणींना भरधाव ट्रकने चिरडले. नागपूरच्या पारडी बाजार परिसरात ही घटना घडली आहे. अपघातामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. दोघी जणी दूध आणण्यासाठी गेल्या होत्या. या अपघातानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.

बाईक घसरल्याने अपघात 

तर तिसरी अपघाताची घटना जालन्यामध्ये घडली आहे. जालन्यामध्ये बाईकवरुन जाणाऱ्या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. बाईक घसरुन अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -