घरलाईफस्टाईलRecipe : नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे धिरडे आणि कुटुंबाला करा खूश

Recipe : नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे धिरडे आणि कुटुंबाला करा खूश

Subscribe

लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. ती रेसिपी म्हणजे बटाट्याचे धिरडे. बटाट्याचे (Potato) धिरडे (Dhiarade) बनवण्यासाठी जास्त वस्तूची गरज नाही. घरातील आहेत त्या वस्तू वापरून तुम्ही धिरडे बनवू शकता.

आज काय बनवायचे असा प्रश्न रोज सकाळी उठल्यावर पडतो. पोहे, उप्पीट, इटली, डोसा, हे रोजचे ठरलेले मेन्यू आहेत. पण सर्वांची आवड वेगवेगळी असल्याने नेमकं काय बनवायचं असे प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी अडचणीत येते ती आई. नाश्ता हेल्दी आणि पोटही भरलं पाहिजे, यासाठी आईची धडपड चालू असते. आता कसलीही काळजी करू नका. लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. ती रेसिपी म्हणजे बटाट्याचे धिरडे. बटाट्याचे (Potato) धिरडे (Dhiarade) बनवण्यासाठी जास्त वस्तूची गरज नाही. घरातील आहेत त्या वस्तू वापरून तुम्ही धिरडे बनवू शकता. तर चला जाणून घेऊ बटाट्याचे धिरडे बनवण्याची रेसिपी (Recipe).

बटाट्याचे धिरडे बनवण्यासाठी लागणारी सामग्री

- Advertisement -

4 बटाटे
2 वाट्या गव्हाचे पीठ
2 चमचे रवा
3 ते 4 लसूण
आल्याचा छोटा तुकडा
3 हिरवी मिरची
हळद चिमूटभर
मीठ चवीनुसार
आणि कोथिंबीर

कृती

- Advertisement -

बटाटे सोलून त्याला बारीक खिसून घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ, रवा, लसून, आल्याची पेस्ट, हळद चिमूटभर घालून घ्या. हिरवी मिरचीचे छोटे तुकडे टाका. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. मिश्रण हे पातळ किंवा घट्ट करू नका. धिरडे कुरकुरीत होण्यासाठी रव्याचा वापर केला आहे. तयार केलेल्या पिठामध्ये काही गडबड असेल तर रवा पाण्यात भिजवून पिठात मिक्स करून घ्या. आता पॅन गरम करून त्यावर तेल घालून धिरड्याचे पीठ टाकून घ्या. त्यावर थोडी कोथिंबीर घालून पसरवून चांगले फ्राय करून घ्या, असे झाले तुमचे धिरडे तयार. हे तुम्ही दही किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -