घरलाईफस्टाईलगुळवेलीच्या सेवनामुळे यकृतावर कोणताही परिणाम नाही, आयुष मंत्रालयाचा दावा

गुळवेलीच्या सेवनामुळे यकृतावर कोणताही परिणाम नाही, आयुष मंत्रालयाचा दावा

Subscribe

गुळवेलीच्या अभ्यासात अनेक त्रुटी

रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘गुळवेल’ या औषधी वनस्पतीच्या सेवनामुळे शरीरावर गंभीर परिणाम असल्याचा इशारा मुंबईतील डॉक्टरांनी दिला होता. परंतु यावरून आयुष मंत्रालयाने चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच गुळवेलीच्या सेवनामुळे यकृतावर कोणाताही परिणाम होत नसल्याचे जाहीर केले आहे. यावर स्पष्टीकरण देत आयुष मंत्राललने सांगितले की, कोणत्याही औषधी वनस्पतींना विषारी असे लेबल लावण्यापूर्वी लेखकांनी मार्गदर्शन तत्वांचे पालन करत योग्य वनस्पतीची निवड करणे गरजेचे होते. जे त्यांनी केले नाही. मुंबईतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर २०२० ते डिसेंबर या काळात किमान सहा रुग्णांना यकृतासंबंधीत गंभीर आजार होते. या रुग्णांना कावीळ आणि थकवा असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तपासणीत या रुग्णांनी गुळवेलीचे सेवन केल्याचे आढळले. तसेच या रुग्णांना थायरॉईड आणि मधुमेह देखील होता. यात त्यांनी गुळवेल या औषधी वनस्पतीचे सेवन केल्यामुळे गंभीर परिणाम जाणवले. असे आयुष मंत्रालय सांगितले.

या अभ्यासासंदर्भात लेखकांनी सर्व आवश्यक तपशील पद्धतशीर स्वरूपात ठेवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे गुलवेलीचा संबंध यकृताच्या गंभीर आजारांशी जोडणे गोंधळाचे ठरु शकते. कारण बर्‍याच काळापासून आयुर्वेदात गुळवेलीचा वापर केला जात आहे. ही गुळवेल किंवा गिलोयचे सेवन विविध रोगांच्या उपचारांसाठी प्रभावी आहे.

- Advertisement -

आयसीएमआरला अभ्यासाचे विश्लेषण केल्यानंतर असेही आढळून आले की, लेखकांनी रुग्णांनी खालेल्या औषधी वनस्पतींचे विश्लेषण केले नाही. रुग्णांनी नक्की गुळवेलीचे सेवन केले की अन्य औषधी वनस्पतींचे हे पाहणे लेखकांची जबाबदारी होती. परंतु तसे न करता गुळवेल आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा केला. हा दावा करण्यापूर्वी त्यांनी वनस्पतिशास्त्रज्ञ किंवा आयुर्वेद तज्ञाचे मत जाणून घेणे गरजेचे होते. असे सांगितले.

गुळवेलीच्या अभ्यासात अनेक त्रुटी

या अभ्यास औषधी वनस्पती योग्यरित्या न ओळख न करता आल्यामुळे त्याचे परिणाम चुकीचे दर्शवले गेले. एक समान दिसणारी औषधी वनस्पती टिनोस्पोरा क्रिस्पाचा यकृतावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. म्हणून लेखांनी गुलवेल या औषधी वनस्पतीला विषारी असल्याचे लेबल लावण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत योग्य निवड करणे गरजेचे होते. जो त्यांनी केला नाही त्यामुळे या अभ्यासात अनेक त्रुटी आहेत. कारण रुग्णांनी कोणते औषध घेतले होते? गुळवेलसह अन्य कोणते दुसरे औषध घेतले होते का? यासंदर्भातील विचार अभ्य़ासात करण्यात आला नाही.

- Advertisement -

अपूर्ण माहितीमुळे पसरले जातायंत भ्रम

अपूर्ण माहितीवर आधारित लेख चुकीच्या माहिती पसरवत आहे. यामुळे आयुर्वेदातील जु्न्या औषधी वनस्पतींना बदनाम केले जात आहे.  गुळवेल यकृत, नसा इत्यादींचे संरक्षण करणारी एक औषधी वनस्पती असून तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत. ही गुळवेल वापरास सुरक्षित असल्याचे शेकडो अभ्यास करण्यात आले आहे. त्यामुळे गुळवेल ही आयुर्वेदातील एक प्रभावी औषध आजही आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -