Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल जुनी राखी अशी करा Reuse

जुनी राखी अशी करा Reuse

Subscribe

रक्षाबंधनाचा सण येत्या 30 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. अशातच रक्षाबंधन झाल्यानंतर घरी काही राख्या पडून राहतात. या सुंदर राख्या ना फेकतात ना त्याचा पुन्हा वापर करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला जुन्या राख्यांचा पुन्हा वापर कसा करायचा याच बद्दल सांगणार आहोत.

- Advertisement -

जुन्या राखीपासून तयार करा डेकोरेटिव्ह वस्तू
तुमच्याकडे असलेल्या जुन्या राख्या घेऊन त्यापासून तुम्ही डेकोरेटिव्ह वस्तू बनवू शकता. याच्या मदतीने डेकोरेटिव्ह वॉल पीस ही तयार करुन तुमच्या खोलीतील कोपऱ्यात लावू शकता. हे दिसण्यास अत्यंत सुंदर दिसेल.

जुन्या राखीपासून तयार करा ब्रेसलेट
जर तुमच्याकडे अशा राख्या असतील ज्यामध्ये कुंदन किंवा सिल्वर डिझाइन असेल तर तुम्ही त्याचा ब्रेसलेट प्रमाणे वापर करू शकता.

- Advertisement -

जुन्या राखीपासून तयार करा बिंदी
राखीच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी सुंदर बिंदी तयार करू शकता. यासाठी तुम्ही राखीमधील मोती काढून टाका. काही मोती एका धाग्यात बांधून त्याच्या दुसऱ्या टोकाला हुक लावा. जेणेकरुन डोक्यावर ती स्थिर राहील. जर तुम्हाला धागा नको असेल तर एक पातळ चैन लावू शकता. या व्यतिरिक्त राखीमधील मोती किंवा स्टोन काढून वेगळे ठेवू शकता.


हेही वाचा- Recipe: रक्षाबंधनासाठी खास घरच्या घरी अशी बनवा काजू कतली

- Advertisment -