घरलाईफस्टाईलकोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त ऑर्गेनिक फेशियल

कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त ऑर्गेनिक फेशियल

Subscribe

ऑर्गेनिक फेशियल करत असताना रसायनयुक्त पदार्थांचा वापर केला जात नाही. त्यामुळे नाजूक त्वचेस कोणतीच हानी पोहचत नाही. ऑर्गेनिक फेशियल करत असताना त्यात नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. कोणत्याही प्रकारची त्वचा असल्यास ऑर्गेनिक फेशियल करता येते. त्यामुळे त्वचेस कोणतीही इजा होत नाही.

ऑर्गेनिक फेशियलमध्ये सर्व घटक नैसर्गिक असल्याने कुठल्याही वयाची व्यक्ती हे फेशियल करू शकते. पिगमेंटेशन, टॅनिंग आणि त्वचेवर उमटलेले व्रण मिटवण्यासाठी ऑर्गेनिक फेशियल खूपच लाभदायक आहे. यासोबतच या फेशियलचा वापर केल्याने सुरकुत्याही कमी होतात. त्वचा टवटवीत होते. त्वचेचा टोन बॅलन्स करण्यासाठीही या फेशियलमुळे फायदा होतो. या फेशियलमध्ये फळे आणि भाज्यांचा वापर होत असल्याने यातून त्वचेला सर्वच आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात. त्यामुळे त्वचा उजळते.

- Advertisement -

कोणत्याही ऋतूत ऑर्गेनिक फेशियल करता येते. अशाप्रकारचे फेशियल हे तेलकट त्वचा आणि मुरूम असलेल्या त्वचेसाठी अधिक परिणामकारक ठरते. उन्हाळ्यात ऑर्गेनिक फेशियल केल्यास त्यात असणार्‍या गुलाबपाणी, काकडी, पपईचा पल्प यामुळे उन्हाळ्यात स्किनचे संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात हे फेशियल सर्वोत्तम ठरू शकते.

हिवाळ्यात कोरडी त्वचा कोमल राहण्यासाठी ऑर्गेनिक फेशियल उपयुक्त ठरते. यातील नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या फेशियलचा वापर केल्यास चेहरा मुलायम राहतो, तसेच हे फेशियल लावण्याने चेहर्‍यावरील डाग, व्रण, सुरकुत्या कमी होऊन चेहरा उजळतो.

- Advertisement -

ऑर्गेनिक फेशियलमध्ये त्वचेची काळजी घेतली जात नाही तर पाठ, मान आणि डोक्याचाही मसाज केला जातो. या मसाजमुळे चेहर्‍याच्या पेशी कार्यरत होऊन रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम होते. ज्यामुळे चेहरा तजेलदार दिसू लागतो.

कोणत्याही त्वचेच्या प्रकारानुसार ऑर्गेनिक फेशियल तयार केले जातात. जर तुम्हाला अ‍ॅक्नेची समस्या असेल तशा त्वचेसाठी वेगळा घटकांचा समावेश करून फेशियल केले जाते, तर सुरकुत्या आणि एजिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी यामध्ये अ‍ॅण्टी एजिंग नैसर्गिक साधनांचा वापर करून तुमची त्वचा तरुण दिसण्यास मदत करता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -