नक्की ट्राय करा, रताळ्याची टेस्टी खीर

या उपवासाकरता रताळ्याची टेस्टी खीर हा नवा पदार्थ नक्की ट्राय करा

नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी नवरात्रीची लगबग पाहायला मिळत आहे. नवरात्रीत बरेच जण भक्तिभावाने उपवास करतात. या उपवासाकरता रताळ्याची टेस्टी खीर हा नवा पदार्थ नक्की ट्राय करा

साहित्य

रताळी, तूप, काजू, बदाम, मनुका, नारळाचे दूध किंवा साधे दूध आणि गूळ.

कृती

रताळी उकडून, सोलून आणि किसून घ्या. तुपावर काजू, बदाम, मनुका थोडय़ाशा लालसर रंगावर परता आणि बाजूला काढून ठेवा. याच तुपात रताळ्याचा कीस घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर त्यात नारळाचे दूध किंवा साधे दूध घाला. गूळ घालून चांगले ढवळून घ्या. एक उकळी आल्यावर काजू, बदाम, मनुका घाला. पुन्हा एक उकळी आणून आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा. गुळाऐवजी तुम्ही खजुराचा वापर करून माफक गोड खीरही तयार करू शकता. खजूर घालायचा झाल्यास तो तुपात परतून कुस्करून दुधात घाला.