श्रावणातले उपवासही होतील आणि वजनही कमी होईल, ‘हे’ पदार्थ उपवासाला नक्की खा

उपवासाला विशेष पदार्थ खाल्ले जातात. काही वेळा हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. हे जास्तीचे खाल्ले गेलेले पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.

पावसाळा सुरु झाला की ऊन सावलीचा खेळ करत श्रावण महिना आगमन करतो. श्रावण महिना सुरु झाला की सणांना सुरुवात होते. अनेक जण उपवास सुद्धा करतात. असं म्हंटलं जातं की श्रावणात केलीली पूजा किंवा उपवास हे विशेष फलदायी ठरतात. उपवासाला विशेष पदार्थ खाल्ले जातात. काही वेळा हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. हे जास्तीचे खाल्ले गेलेले पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

काहीच दिवसात श्रावण महिना सुरु होईल. श्रावण महिना सुरु झाल्यावर उपवास आणि त्यासाठी अनेक पदार्थांची रेलचेल सुरु होते. अशातच उपवासाचे अन्न पदार्थ खाऊन वजन वाढू शकतं. पण तुम्हाला माहित आहे का? उपवासादरम्यान तुम्ही तुमच्या आहारामध्ये काहीसा बदल करून तुम्ही तुमचं वजनंही कमी करू शकता त्यामुळे तुमचा उपवासही होईल आणि वजनही कमी होईल.

हे ही वाचा – Receipe : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ आलाय? मग या वेळी ‘उपवासाचा ढोकळा’…

श्रावणात उपवासाला ‘या’ पदार्थाचं सेवन नक्की करा

fiber rich foods for healthy life you should add in your diet

१ – पनीर आणि इतर डेअरी प्रॉडक्ट्स

श्रावणात उपवास केले जातात. त्यामुळे साधंच जेवण केलं जातं. मसाल्याचं प्रमाण जेवणात कमी असतं. त्यामुळे दूध, दही, पनीर आणि इतर डेअरी पदार्थाचे सेवन करावे. उपवासाच्या दिवशी तुम्ही पनीर कच्चे देखील खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी शरीरात गुड फॅट्स जाणे खूप गरजेचे असते. कारण जेव्हा शरीरात गुड फॅट्स जातात तेव्हा तुमचे शरीर ऊर्जा मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करते. त्यामुळे तुमचे वजन कमी होते. पनीरचे सेवन केल्याने तुमचे पॉट दीर्घकाळ भरलेले राहते.

आणखी वाचा – Receipe : पौष्टिक आणि खमंग कच्च्या केळाची टिक्की नक्की ट्राय करा

२ – नट्स आणि ड्राय फ्रुट्स

नट्स आणि ड्राय फ्रुट्स मध्ये भरपूर प्रमाणावर पोषक तत्वे असतात जी शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. नट्स आणि ड्राय फ्रुट्स हे सुपर फूड सुद्धा मानले जाते. मात्र नट्स आणि ड्राय फ्रुट्सचे सेवन करताना इतर कोणत्याही प्रकारचे जंक फूड खाणे टाळा. नट्स आणि ड्राय फ्रुट्स खाण्याने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.

३ – फळे आणि दही

दह्याचे सेवन करणे हे खूप फायदेशीर असते. दही हे पोट डिटॉक्स करण्यासाठी देकील फायदेशीर ठरते. त्यामुळे वजन कामे होण्यास मदत होते. श्रावणातील उपवासादरम्यान दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. उपवासाच्या दिवशी तुमच्या आहारात जीवनसत्व आणि खनिजांचा समावेश होणे गरजेचे असते. त्याचबरोबर फळे खाणे सुद्धा फायदेशीर ठरते फळांमधील अनेक पोषक घटक शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात.

हे ही वाचा – पावसाळ्यात मका खाणे आहे आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे