घरताज्या घडामोडीकोरोनाच्या काळात ऑफिसला जाताय? अशी घ्या काळजी

कोरोनाच्या काळात ऑफिसला जाताय? अशी घ्या काळजी

Subscribe

ऑफिसमध्ये कोणती आणि कशी घ्याल खबरदारी?

जगभर पसरणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वच देशात अक्षरश: कहर केला आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच गोष्टी बंद होत्या. मात्र, कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी देशभरात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरात १ जूनपासून अनलॉक १.० ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आता त्याच्या पुढील टप्प्यात ८ जूनपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरन्ट, हॉस्पिटॅलिटी सर्विसशी संबंधित ठिकाणे, शॉपिंग मॉल उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता काही ठिकाणी ऑफिसेस देखील सुरु झाली आहेत. त्यामुळे तुम्ही जर या कोरोना काळात ऑफिसला जात असल्यास तुम्हाला काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

या नियमांचे करा पालन

  • ऑफिसच्या एन्ट्री गेटवर सॅनिटाझजर डिस्पेंसर असणं आवश्यक आहे. तसेच तापमान मोजण्याची सुविधा देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे.
  • ऑफिसला जाताना हँड सॅनिटाझजर, पेपर सॉप आणि पाणी आपल्या जवळ असणे फार गरजेचे आहे.
  • घरातून बाहेर निघण्यापूर्वी चेहऱ्याला फेस मास्क लावणे गरजेचे आहे.
  • आपल्यासोबत नेहमी पाण्याची बॉटल, औषध आणि जेवणाचा डबा ठेवा.
  • तुम्हाला आवश्यक असणारे मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर, पॉवर बँक, ईयरफोन आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. जेणे करुन आपल्याला दुसऱ्याकडून या वस्तू घेण्याची वेळ येणार नाही.
  • जर तुम्ही ऑफिसमध्ये कॉफी किंवा चहा घेत असाल तर तुमच्यासोबत टीबॅग्स ठेवा. यामुळे तुम्हाला पैंट्रीमधील चहा घेण्याची गरज पडणार नाही.
  • तुम्ही जर कार किंवा दुचाकीने ऑफिसला जात असाल तर आपली गाडी स्वच्छ ठेवा.

ऑफिसमध्ये कोणती खबरदारी घ्यावी?

  • ऑफिसमध्ये काम करताना आपले मास्क काढू नका. त्याचप्रमाणे सतत मास्कला हात लावणे टाळा.
  • डेस्कवर मोबाईल किंवा लॅपटॉप ठेवण्यापूर्वी डेस्क स्वच्छ करुन घ्या.
  • ऑफिसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.
  • लिफ्टचा वापर करणे टाळा

घरी गेल्यावर काय कराल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -