घरलाईफस्टाईलयोग्य आहार, व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली

योग्य आहार, व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली

Subscribe

'आरोग्याची गुरुकिल्ली' या विषयावर नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी योग्य आहार, व्यायम हीच खरी आरोग्याची गुरुकल्ली असल्याचे प्रतिपादन केले.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केले. बदलापूरातील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्ष आणि आदर्श महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर डॉ. तात्याराव लहाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना डॉ. तात्याराव लहाने यांनी वरील प्रतिपादन केले. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन घोरपडे यांनी स्वागत, प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांनी प्रास्तविक तर विद्युत जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. रघुनाथ पाटील, दीपक काटदरे, संजय गायकवाड, तुषार आपटे, डॉ. शकुंतला चुरी, अच्युत जोशी, आशिष गोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

डॉ.तात्याराव लहाने म्हणाले की, लोकसंख्या प्रचंड आणि त्याप्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय सांभाळताना खूप प्रमाणात मानसिक ताण निर्माण होतो. याचा परिणाम हृदयरोग, मधुमेहासारख्या व्याधी शरीराला होतो. यापासून दूर रहायचे असल्यास नियमित संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. आई पेक्षा जगात कोणताही मोठा देव नाही, असेही त्यांनी व्याख्यानाच्या प्रारंभी सांगितले. शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच कौटुंबिक स्वास्थ्यही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ‘लहान मूल सहा वर्षाचे होई पर्यंत त्याच्या हातामध्ये मोबाईल अजिबात देऊ नका आणि घरात रोज सर्वजण एकत्र जमल्यावर घरात दोन तास मोबाइल कटाक्षाने बंद ठेवा. त्याच प्रमाणे अंधारात मोबाईल अजिबात वापरू नका. यामुळे कौटुंबिक आरोग्य चांगले राहील’, असा मोलाचा सल्लाही डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला.

सध्या सर्वांचे आरोग्य बिघडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे संतुलित आणि वेळेवर आहार नाही हे आहे, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. जेवण आणि झोप यात किमान तीन तासाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र आपण उशिरा जेवतो आणि जेवल्यावर व्यायाम न करता लगेच झोपतो त्याचा परिणाम आरोग्य बिघडण्यावर होतो असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -