घरमुंबईअपघातविरहित चालकांचा एसटीला विसर

अपघातविरहित चालकांचा एसटीला विसर

Subscribe

महामंडळाने मोडली अनेक वर्षांची परंपरा

एसटी महामंडळाकडून अपघात-विरहित सेवा देणार्‍या चालकांचा दरवर्षी सपत्निक सत्कार केला जायचा. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळांत सुरू होती. मात्र मागील पाच वर्षांपासून ही सत्कार परंपरा एसटी महामंडळाने मोडीत काढली आहे. सलग पाच, दहा, पंधरा वर्षे अपघातविरहित सेवा देणार्‍या चालकांचा सत्कार का नाही, असा प्रश्न एसटी कर्मचारी विचारत असताना महामंडळाकडे मात्र त्याचे काहीच उत्तर नाही.

‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नेहमीच प्रवाशी जनतेची सुरक्षित वाहतूक व्हावी आणि एसटीच्या चालकांनी विना अपघात सेवा करावी अशी अपेक्षा असते.

- Advertisement -

त्यासाठीच एसटी महामंडळकडून वारंवार एसटी चालकाचे समुपदेशन होत असते. सुरक्षित प्रवासासाठी चालकाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षिण, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी असे मार्ग महामंडळाकडून अवलंबिले जातात. सुरक्षित सेवा देण्यासाठी चालक प्रोत्साहीत व्हावे म्हणून ५ वर्षे, १० वर्षे, १५ वर्षे एकही अपघात न करणार्‍या चालकांचा सपत्निक सत्कार महामंडळाकडून केला जायचा. मात्र दिवाकर रावते राज्याचे परिवहन मंत्री झाल्यापासून ही प्रथा बंद करण्यात आली.

अगोदर अपघात विरहीत सेवा देणार्‍या चालकांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये रोख, प्रमाणपत्रे, स्मृती चिन्ह आणि सुरक्षित सेवेचे बिल्ले देऊन सन्मानित केले जात होते. २०१३ ला एसटी महामंळाकडून ५१७ चालकांना भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर २०१४ मध्य सुद्धा ५३७ चालकांचा सत्कार केला गेला. मात्र त्यानंतर चालकांचा सत्कार झालाच नाही.

- Advertisement -

एसटीच्या ३४ हजार चालकांची उपेक्षा
देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. १ लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. या पुरस्कारचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत. मात्र आज एसटी महामंडळाकडून त्यांना प्रोत्साहन मिळेनासे झाले आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -