घरलाईफस्टाईलहे रोप घरात लावा; कॅन्सरला दूर ठेवा

हे रोप घरात लावा; कॅन्सरला दूर ठेवा

Subscribe

कॅन्सर या महाभयानक रोगाचे योग्य निदान काढण्यासाठी आरोग्य क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरु आहे. मात्र सर्व प्रकारच्या कॅन्सरला रोखणारे रामबाण औषध सापडलेले नाही. मात्र कॅन्सरला कारणीभूत ठरणारे प्रदूषके तुमच्या घरातून तुम्हाला दूर ठेवता येणार आहेत. शास्त्रज्ञांनी एका अशा रोपट्याचा शोध लावलाय जो ही प्रदूषके तुमच्या घरात टीकू देणार नाही. वॉशिंग्टन विद्यापीठाने जनुकिय सुधारणा करुन पोथोस आयवी (Pothos ivy) नावाचे एक घरगुती प्लांट तयार केले आहे. जे तुमच्या घरातल्या हवेतून क्लोरोफॉर्म आणि बेंझिन सारखे घातक सयुंगे नष्ट करु शकेल.

वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार पोथोस प्लांट हवेमध्ये प्रोटीन सोडतो, ज्याला 2E1 म्हणतात. हे प्रोटीन घातक सयुंगाचे रुपांतर अणूमध्ये करते. हे अणू पोथोस स्वतःच्या वाढीसाठी वापरतो. या संशोधनाबाबत प्राध्यापक स्टुअर्ट स्ट्रँड असे म्हणतात की, “लोकांना आपल्या घरात सेंद्रीय पद्धतीने निर्माण होणाऱ्या घातक सयुंगाबाबत माहिती नसते. शास्त्रज्ञांनीही आजपर्यंत लोकांना जागृत करण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळेच आम्ही हे घरगुती प्लांट निर्माण केले. जे कॅन्सरला कारणीभूत ठरणारे प्रदूषके घरातून नष्ट करेल.”

- Advertisement -

हे करा – कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 

पोथोस प्लांट हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि क्लोराईड शोषून घेत त्याचा स्वतःचे अन्न म्हणून वापर करतो. समशीतोष्ण वातावरण असलेल्या जागी पोथोस प्लांटला फुले येत नाहीत, त्यामुळे जनुकिय विकास करुन बनवलेले हे रोपटे पराग कणाद्वारे इतर ठिकाणी वाढवता येत नाही.

तुमच्या घरात जर तुम्ही हे प्लांट ठेवणार असाल तर स्ट्रँड यांचा महत्त्वाचा सल्ला आधी ऐकून घ्या. पोथोस घरात असा जागेवर ठेवायचे आहे जिथे हवा खेळती राहू शकेल. म्हणजेच पंख्याखाली किंवा मोकळी हवा असेल अशा ठिकाणी प्लांट ठेवले तर पोथोसची पाने हवेचे आदान प्रदान करु शकतील.
या प्लांटवर सध्या शास्त्रज्ञांनी टीम आणखी काम करत आहे. जेणेकरून आपल्या घरातील इतर घातक प्रदूषके शोषूण घेण्याची क्षमता यात विकसित करता येईल.

अशी घ्या दमा रोगाची काळजी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -