थंडीत काय खावे?

नोव्हेंबर महिना म्हणजे हिवाळा आणि हिवाळा म्हटल की थंडी. ही थंडी सुरुवातीला जरी बरी वाटतं असली तरी नंतर मात्र ती सर्दी खोकल्याबरोबर सांधेदुखीही घेऊन येते. यामुळे थंडीच्या दिवसात आहाराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

गाजर
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गाजरचा ज्यूस घ्यावा. सलाडमध्येही गाजराचा समावेश करावा. गाजर उष्ण असून त्यात अ जीवनसत्वही मुबलक प्रमाणात असते. यामुळे हिवाळ्यात गाजराचा ज्यूस, गाजराची कोशिंबीर , गाजराचा हलवा आवर्जून खावा. गाजर हे उत्तम फायबर आहे. गाजर खाल्याने भूकही वाढते त्यामुळे आम्लपित्त कमी होते. वजनही वाढते.

बोरं
हिवाळ्यात बाजारात पालेभाज्या, फळभाज्याच नाही तर अनेक प्रकारची फळेही येतात. यात प्रामुख्याने बोरं असतात. बोरं पचायला जड आणि चवीला आंबट गोड तर कधी तुरट लागतात. बोरं खाल्ल्याने पित्त आणि कफ कमी होतो.पोटही साफ होते.

जव
जव हे शक्तीवर्धक असतात. पण आपल्याकडे फारसे खाल्ले जात नाही. थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो, नाक वाहते अशा व्यक्तींनी आहारात जवाचा समावेश करावा.थंडीत सांधेदुखीवरही जव उपयोग होतो. जवामध्ये ‘ब’ जीवनसत्त्व आणि अमिनो आम्ल मुबलक असते.

लसूण
भारतीय खाद्यसंस्कृतीत लसणाला विशेष महत्व आहे.लसणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतो. एक कप पाण्यात लसणीची एक पाकळीत ठेचून पाण्यात उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवून त्याचा काढा दिवसात एकदा तरी घ्यावा. मूत्रसंसर्ग झाल्यास लसणाचा हा काढा पिल्यास लवकर बरे वाटते.