घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटएकेकाचं ब्रॅन्डिंग!

एकेकाचं ब्रॅन्डिंग!

Subscribe

बाजारातला ब्रॅन्डिंगचा फंडा हळुहळू राजकारणात कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरावा तसा शिरला…आणि हळुहळूच एकेकाचा ब्रॅन्ड लोकांसमोर आला.

…भ्रष्टाचाराचा आरोप झालेली राजकारणातली माणसं स्टार्च केलेले शुभ्र कपडे घालून लोकांसमोर येतात…असे लोक शुभ्रतेच्याही आधी आपल्या इभ्रतीचं ब्रॅन्डिंग करतात…

- Advertisement -

…एखाद्या पक्षाचा प्रवक्ता एखाद्या वाहिनीवरच्या गरमागरम टॉक शोमध्ये जोरजोरात हातवारे करतो…तेव्हा तो आपल्या मनगटावरच्या ब्रेसलेटचं ब्रॅन्डिंग करतो…

…एखादा नेता आपल्या भाषणात मर्द हा शब्द आल्याशिवाय आपलं भाषण संपवत नाही…तेव्हा त्याला आपल्या पक्षाच्या कोणे एके काळच्या मर्दानगीचा बाजारातून हरवलेला ब्रॅन्ड पुन्हा घासूनपुसूून समोर आणायचा असतो…

- Advertisement -

…तसाच एखादा नेता आपल्या गळ्यात उबदार मफलर घालतो…आणि रंजल्यागांजल्यांच्या प्रतिनिधीत्वाचं बंडखोर ब्रॅन्डिंग करतो…

…असंच कुणीतरी आपल्या भाषणात विकास ह्या शब्दाची दहा वेळा उजळणी करतं…तेव्हा त्याला स्मार्ट ह्या शब्दाचं ब्रॅन्डिंग करायचं असतं…

…असंच कुणीतरी आपल्या भाषणात चटकदार चारोळ्यांचं वाचन करतं…तेव्हा त्याला त्याच्या बदलत्या घरोब्याचं ब्रॅन्डिंग करायचं असतं…

…असंच कुणाला तरी जेव्हा आपला भ्रष्टाचारविरोध प्रसिध्दीच्या झोतात आणायचा असतो…तेव्हा त्याला पुरस्कारासाठी ब्रॅन्डिंग करायचं असतं…

…जेव्हा एखाद्याला दिल्लीत संसदेबाहेर चॅनेलला फुटकळ बाइट देतानाही चेहर्‍यावर खाऊ की गिळू भाव ठेवायचे असतात…तेव्हा त्याला वरच्या मंत्रीपदासाठी अधिक निष्ठावंत ब्रॅन्डिंग करायचं असतं…

…जेव्हा कुणाला तरी सारखं देश आणि धर्माबद्दल बोलायचं असतं…तेव्हा त्याला मतांच्या ध्रुवीकरणाचं ब्रॅन्डिंग करायचं असतं…

…एखादा असाच कुणी जेव्हा आपल्या मुलाबाळांसाठी फिरत्या रंगमंचावरचं राजकारण करत असतो…तेव्हा त्याला आपल्या कुटुंबाचं ब्रॅन्डिंग करायचं असतं…

…आणि जेव्हा एखाद्याचं राजकारणातलं उपद्रवमूल्य कमी झालेलं असतं…तेव्हा त्याच्यावर राजकारणातल्या त्याच्या अस्तित्वाचंच ब्रॅन्डिंग करायचं असतं…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -