घरलोकसभा २०१९ईशान्य मुंबईत संजय दिना पाटलांना उमेदवारी निश्चित!

ईशान्य मुंबईत संजय दिना पाटलांना उमेदवारी निश्चित!

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ईशान्य मुंबई अर्थात उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून भाजपकडून किरीट सोमय्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं दाजात आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार म्हणून कोण उभं राहणार? याविषयी बरीच चर्चा सुरू होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये ही जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडल्यामुळे माजी खासदार संजय दीना पाटील यांनाच इथून पुन्हा उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये किरीट सोमय्यांसमोर त्यांचा निभाव जरी लागला नसला, तरी मोदी लाटेमध्ये देखील जिथे इतर उमेदवारांनी शरणागती पत्करली होती, तिथे संजय दीना पाटलांनी मात्र तब्बल २ लाखांहून जास्त मतं ओढून आणली होती.

२०१४मधील आकडेवारी

- Advertisement -
  • किरीट सोमय्या – भाजप – ५ लाख २५ हजार २८५
  • संजय दीना पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ८ हजार १६३
  • मेधा पाटकर – आप – ७६ हजार ४५१
  • मछिंद्र चाटे – बसप – १७ हजार ४२७
  • नोटा – ७ हजार ११४

शिवसेनेचा सोमय्यांना विरोध

मागच्या निवडणुकांच्या आकडेवारीवरून किरीट सोमय्यांनी या मतदारसंघात क्लीन-स्वीप ठरावा असा विजय मिळवला होता. त्याच वेळी आपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या मेधा पाटकर यांनी देखील ७६ हजार मतं मिळवली होती. त्याच आधारावर आता मोदी लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर खासदार किरीट सोमय्यांना त्यांची सीट राखण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहेत. मात्र युतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसून खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध आहे. त्यातच जर किरीट सोमय्या पुन्हा उभे राहिले तर शिवसेना त्यांच्या विरोधात काम करेल, अशी भूमिका स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.


वाचा या मतदारसंघाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी

NCP Candidate Sanjay Dina Patil
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील

पाटील उभं करणार तगडं आव्हान!

एकीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनच मदत नसताना संजय दीना पाटलांसारखा अनुभवी उमेदवार किरीट सोमय्यांसमोर तगडं आव्हान उभं करू शकतो. त्यातच या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरलेली डम्पिंग ग्राउंडची समस्या, लोकल रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे अशा मुद्द्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात किरीट सोमय्या अपयशी ठरल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आता मतदार पुन्हा किरीट सोमय्यांवर विश्वास दाखवतील की संजय दीना पाटील यांनाच पुन्हा खासदारकीची लॉटरी लागेल? हे महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याआधीच संजय पाटील यांनी मतदारसंघात प्रचार देखील सुरू केला आहे.

Sabjay Dina Patil Banner
संजय दिना पाटील बॅनर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -