घरमहा @२८८अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ - म. क्र. १

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ – म. क्र. १

Subscribe

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा (विधानसभा क्र.१) विधानसभा मतदारसंघ आहे.

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ हा नंदुरबार जिल्हयातील आहे.अक्कलकुवा मतदार संघात आदीवासी , तसेच मुस्लिम बहुल मतदार असलेला मतदार संघ आहे. अक्कलकुवासह मोठया गावांमधे पटेल मतदार असले तरीही या मतदार संघात आदीवासी संख्या निर्णायक आहे.अक्कलकुवा शहरात मुस्लिम मुलांसाठी धार्मिक शिक्षण देणारी देवबंद शाखेची संस्था असुन या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी परीसरातील तरुणांसह देशभरातील तरुण हजेरी लावतात.या मतदार संघात दुर्गम भागात देखिल मतदार पाडयांमधे रहात असल्याने प्रशासनाला मतदानासाठी दमछाक करावी लागते.

मतदार संघ क्रमांक – १

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसुचित जमाती

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – 139889
महीला – 138028
इतर – 0
एकुण – 277917

विदयमान आमदार – ॲड के सी पाडवी, भारतीय राष्ट्रिय काँगेस

विदयार्थी दशेपासुनच चळवळीबरोबर बांधलेले ॲड के सी पाडवी यांनी कायदयाची पदवी घेवुन उच्च्‍ न्यायालयात काम पहाण्यास सुरुवात केली. या कालावधीत अक्कलकुवा मतदार संघातील तरुण कार्यकत्यांमधील त्यांची छवी पहाता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांना 1990 मधे संधी दिली. या संधीचे सोने करीत ॲड के सी पाडवी यांनी 52 टक्के मते घेत विजय मिळवला. पण त्यानंतर 1995 मधे त्यांना पक्षाचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणुक लढवत पुन्हा विजय मिळवला. यानंतर सलग चार वेळेस त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळवत हा गड काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवला. विशेषता गेल्यावेळी सर्व भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतांना देखिल ॲड के सी पाडवी यांनी आपला करीष्मा कायम ठेवला.

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड के सी पाडवी

२०१४ विधानसभा निवडणुकीची परीस्थिती

ॲड के सी पाडवी भारतीय काँग्रेस पार्टी  64410
रुपसिंग पराडके राष्ट्रवादी काँग्रेस 48635
दिलावरसिंग पाडवी भारतीय जनता पार्टी 32701
आमशा पाडवी शिवसेना 10349


हे ही वाचा – नंदुरबार लोकसभा मतदारसंघ


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -