घरमहा @२८८अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १७२

अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७२

Subscribe

अणुशक्ती नगर (विधानसभा क्र. १७२) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

भाभा अणुऊर्जा केंद्र असलेला हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. अल्पसंख्याक आणि दलित मतांची संख्या या मतदारसंघात जास्त आहे. त्याच आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ १९९९पासून आपल्या ताब्यात ठेवला होता. मात्र, २०१४मध्ये शिवसेनेच्या तुकाराम काटे यांनी त्यांचा पराभव केला. अणुऊर्जा केंद्र आणि त्याच्याशी संबंधित कर्मचारी वर्गाच्या निवासस्थानांचं प्रमाण देखील इथे जास्त आहे. या मतदारसंघात एकूण २७४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५९,५६९
महिला – १,२९,६१९

- Advertisement -

एकूण मतदार – २,८९,१८८


tukaram kate
तुकाराम काते

विद्यमान आमदार – तुकाराम काते, शिवसेना

कट्टर शिवसैनिक असलेल्या तुकाराम कातेंनी २०१४मध्ये नवाब मलिक यांना अवघ्या १००७ मतांनी पराभूत करत पहिल्यांदाच आमदारकी मिळवली. याआधी त्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि नंतर स्थापत्य समिती अध्यक्षपदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची बरीच चर्चा झाली होती. मेट्रो प्रकल्पाच्या कामांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या आणि प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन यासाठी आवाज उठवल्यामुळेच हल्ला झाल्याचा दावा देखील त्यांनी नंतर केला होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) तुकाराम काते, शिवसेना – ३९,९६६
२) नवाब मलिक, राष्ट्रवादी – ३८,९५९
३) विठ्ठल खरोटमोल, भाजप – २३,७६७
४) राजेंद्र माहुलकर, काँग्रेस – १७,६१५
५) अकबर हुसेन, शेकाप – ४९१०

नोटा – १५७७

मतदानाची टक्केवारी – ४६.७८ %


हेही वाचा – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -