घरताज्या घडामोडीशासनाकडून STसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर - अनिल परब

शासनाकडून STसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर – अनिल परब

Subscribe

दिवाळी सण तोंडावर आला असताना एसटी कर्मचार्‍यांचा हातात एकही दमडी पडलेली नाही. त्यामुळे या आर्थिक घुसमटीला कंटाळून रत्नागिरी डेपोचे चालक आणि जळगावच्या एसटी कंडक्टरांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. दोन जीव गमावल्यानंतर एसटी महामंडळाला आता जाग आली आहे. सोमवारी दुपारी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिवाळीपूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन देण्याची घोषणा केली होती. पण आता दोन महिन्यांऐवजी मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे, असे आज अनिल परब यांनी घोषणा केली आहे. तसेच आता शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

अनिल परब म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत यावर मार्ग काढण्यात आला आहे. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे.’

- Advertisement -

पुढे अनिल परब म्हणाले की, ‘लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे तीन हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -