घरक्राइमSBI ला 1017.93 कोटींचा गंडा, रायगडच्या लोहा इस्पात कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

SBI ला 1017.93 कोटींचा गंडा, रायगडच्या लोहा इस्पात कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई : भारतीय स्टेट बँकेला (SBI) 1017.93 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रायगड येथील लोहा इस्पात लिमिटेड (Loha Ispaat Limited) या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एसबीआयने 11 मे 2023 रोजी तक्रार दाखल केली होती.

लोहा इस्पात, तिचे संचालक व हमीदार तसेच मुंबईस्थित एक खासगी कंपनी आणि सरकारी कर्मचाऱ्यासह अज्ञात व्यक्तींनी स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच इतर पाच कन्सोर्टियम सदस्य बँकांचे सुमारे 1017.93 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप एसबीआयने केला आहे. त्याआधारे सीबीआयने एफआयआर नोंदवला असून त्यात लोहा इस्पातचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पोद्दार, पूर्णवेळ संचालक संजय बंसल तसेच संचालक आणि हमीदार राजेश अगरवाल, अंजू पोद्दार आणि मनीष गर्ग यांची नावे आहेत.

- Advertisement -

या आरोपींनी 2012 ते 2017 या कालावधीत सुमारे 812.07 कोटी रुपये इतके खेळते भांडवल, मुदत कर्ज आणि एनएफबीचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर 5 कन्सोर्टियम सदस्य बँका म्हणजेच बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांची फसवणूक करण्याचा कट रचला. त्यांनी काल्पनिक विक्री – खरेदीचे व्यवहार दाखवून एसबीआय आणि इतर 5 कन्सोर्टियम सदस्य बँकांना फसवले तसेच थकित कर्जाचा भरणा न केल्याने सुमारे 1017.93 कोटी रुपयांचा फटका एसबीआय आणि 5 कन्सोर्टियम सदस्य बँकांना बसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कंपनीचे बँक खाते 28 ऑगस्ट 2014 पासून एनपीए (non-performing asset) घोषित करण्यात आले. त्यानंतर स्टेट बँकेच्या फ्रॉड आयडेंटिफिकेशन कमिटीने 13 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत हा प्रकार ‘फसवणूक’ म्हणून वर्गीकृत केले, असे सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी दिल्ली, मुंबई, रायगड आणि ठाणे यासह 9 ठिकाणी आरोपींच्या निवासस्थानी आणि सबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आणि संबंधित कागदपत्रे आणि सामग्री जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IAF अधिकारी निखिल शेंडे अडकला पाकच्या जाळ्यात; ATS ची पुणे न्यायालयात माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -