घरताज्या घडामोडीCoronavirus: राज्यात ४८ तासांत १२९ पोलीस कोरोनाबाधित!

Coronavirus: राज्यात ४८ तासांत १२९ पोलीस कोरोनाबाधित!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची पर्वा न करताना अहोरात्र काम करत आहेत. या भयाण परिस्थितीत सर्वांचे रक्षण करणारे पोलीस सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात मागील ४८ तासांत १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ३ हजार ३८८वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे ३६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९४५ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी एएनआयला दिली आहे.

- Advertisement -

९ मे रोजी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकरिता दिलासादायक बातमी आली होती. तीन दिवसांत महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवीन कोरोना पोलीस रुग्ण आढळून आल्याचे समोर आले होते. पण आज आलेल्या एएनआयच्या माहितीनुसार, मागील ४८ तासांत १२९ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडा ९७ हजारांहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ३ हजारांहून अधिक आहे. तसेच आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: पाकिस्तानमध्ये २४ तासांत आढळले कोरोनाचे ६४०० रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -