घरमहाराष्ट्रशिक्षकांच्या १५ टक्के बदल्यांचा निर्णय मागे, आता फक्त विनंती बदल्या!

शिक्षकांच्या १५ टक्के बदल्यांचा निर्णय मागे, आता फक्त विनंती बदल्या!

Subscribe

राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय आता फिरवण्यात आला आहे. रविवारी कोल्हापुरात यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर हा निर्णय फिरवण्यात आला आहे. याआधी घेतलेल्या निर्णयानुसार १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, याला शिक्षक संघटनांकडून विरोध करण्यात येत होता. ऐन कोरोनाच्या संकटकाळात शिक्षकांच्या बदल्या (Teachers Transfer) करणं चुकीचं असल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी शरद पवार यांच्याही कानावर आपल्या मागण्या घातल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेल्या बैठकीमध्ये १५ टक्के शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय बदलण्यात आला आहे. आता फक्त ज्या शिक्षकांनी बदल्यांची विनंती केली आहे, अशाच शिक्षकांच्या बदल्या होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. अशा बदल्यांचं प्रमाण हे १ टक्क्याहून देखील कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -