घरCORONA UPDATEराज्यात 24 तासांत 1910 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7 रुग्णांचा मृत्यू

राज्यात 24 तासांत 1910 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 1 हजार 910 इतक्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,26, 918 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. तर आज दिवसभरात एकूण 1273 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 12,355 सक्रिय रुग्ण संख्या आहे.

- Advertisement -

मुंबईत 832 रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.7 टक्के

मुंबईत आज 832 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांची संख्या 11,13,829 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.7 टक्के इतका झाला आहे. मुंबईत सध्या 6,269 इतके रुग्ण सक्रिय आहेत. तसेच रुग्ण दुपटीचा दर 970 दिवसांवर गेला आहे.

- Advertisement -

देशात 8 हजार 586 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 586 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 506 वर पोहोचली आहे. तसेच, देशातील एकूण बाधितांचा आकडा 4 कोटी 43 लाख 57 हजार 546 वर पोहोचला आहे.


हेही वाचा : देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाचे कंत्राट मिळविण्यासाठी सल्लागाराशी संगनमत, भाजपचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -