घरक्राइमउमेश कोल्हे खून प्रकरणात NIA कडून आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचे बक्षीस

उमेश कोल्हे खून प्रकरणात NIA कडून आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचे बक्षीस

Subscribe

अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी चाकूने भोसकून हत्या झाली होती. या प्रकरणाती फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​​फिरोज अहमद याच्याविरुद्ध NIAने रोख बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे NIA कडून सांगण्यात आले.

अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी उमेश कोल्हे यांची त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी शमीम अहमदचाही पोलिस शोध घेत आहेत. यापूर्वी एनआयएने मुदस्सर अहमद (वय -22) शाहरुख पठाण (वय -25), अब्दुल तौफिक (वय -24), शोएब खान (वय -22), अतीब रशीद (वय -22) डॉ. युसूफ खान बहादूर खान (वय -24) यांच्यासह 7 आरोपींना ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली होती. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तपासानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -