घरमहाराष्ट्रविदर्भ- मराठवाड्याला दिलासा, कृषीपंप जोडणीसाठी मिळाले २०० कोटी

विदर्भ- मराठवाड्याला दिलासा, कृषीपंप जोडणीसाठी मिळाले २०० कोटी

Subscribe

षी पंपांच्या जोडणीसाठी ४९९ कोटींची मागणी करण्यात आली होती. कंत्राटदारांना साधन सामुग्री खरेदी आणि उभारणीच्या कामासाठी अतिरिक्त निधीची गरज असल्याचे लक्षात घेत ही मागणी करण्यात आली होती.

विदर्भ आणि मराठवाड्यासाठी खूशखबर! विदर्भ-मराठवाडा विभागातील प्रलंबित कृषी पंपाच्या जोडणीसाठी २०० कोटी रुपयांना आज सभागृहाने आज मंजूरी दिली आहे. उर्जा विभागाच्या २हजार २९१ कोटींच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडल्या आणि सभागृहाला या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. यावेळी प्रलंबित कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी २०० कोटी मंजूर करण्यात आले.

वाचा – शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करा परंतु ठोस निर्णय घ्या – धनंजय मुंडे

आता लवकरच वीज जोडणी

कृषी पंपांच्या जोडणीसाठी ४९९ कोटींची मागणी करण्यात आली होती. कंत्राटदारांना साधन सामुग्री खरेदी आणि उभारणीच्या कामासाठी अतिरिक्त निधीची गरज असल्याचे लक्षात घेत ही मागणी करण्यात आली होती. पण ही मागणी प्रलंबित होती. अखेर या प्रकल्पाला २०० कोटी रुपयांना मंजूरी मिळाली आहे.

- Advertisement -
वाचा- गोंधळात पुरवण्या मागण्या मांडणे लोकशाहीच्या विरोधात – जयंत पाटील

कोराडी प्रकल्पासाठी दिला निधी

महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्प संच क्रमांक ६करिता २०१८-१९ मध्ये ५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीपैकी जागतिक बैंकेकडून महानिर्मितीला २२ कोटींच्या अनुदान समायोजनासाठी मंजूरी देण्यात आली. महावितरण कंपनीने सन २०१८-१९ साठी ११हजार ३३६ कोटींची मागणी सादर केली होती. सन २०१८-१९ साठी अर्थसंकल्पीय तरतूद ४ हजार ९४१ कोटींची मागणी मंजूर केली. तसेच महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पातील संच क्रमांक 6 साठी सन २०१८-१९ करीता 30 कोटींची तरतूद करण्यात आली. यापैकी जागतिक बैंकेकडून महानिर्मितीला परस्पर १४.१४ कोटी कर्ज प्राप्त झाले. या रकमेच्या समायोजनासाठी ६९ कोटीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -