घरमहाराष्ट्रकाँग्रेसचे 22 आमदार फुटण्याच्या तयारीत, ठाकरे गटाचा मोठा दावा

काँग्रेसचे 22 आमदार फुटण्याच्या तयारीत, ठाकरे गटाचा मोठा दावा

Subscribe

राज्यातील शिंदे सरकारचा हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर तारीख पे तारीख मिळत असतानाच चंद्रकांत खैरेंच्या दाव्यानं नव्याच वादाला फोडणी मिळाली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत खैरेंनी हे वक्तव्य केलंय

मुंबईः राज्यातील सत्तासंघर्षात सुंदोपसुंदी सुरू असतानाच आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिंदे-फडणवीस सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवल्याचं सांगत चंद्रकांत खैरेंनी बार उडवून दिलाय. चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघालंय.

राज्यातील शिंदे सरकारचा हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर तारीख पे तारीख मिळत असतानाच चंद्रकांत खैरेंच्या दाव्यानं नव्याच वादाला फोडणी मिळाली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत खैरेंनी हे वक्तव्य केलंय. ते म्हणाले, निवडणुकीत मुस्लिम समाजाची बोनस मते शिवसेनेला मिळतात हा इतिहास आहे. मुस्लिमांची 20 टक्के मते पुन्हा एकदा शिवसेनेला मिळणार असून, ती आपली बोनस मतं आहेत. तसेच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाल्यानंतर हे सरकार कोसळेल. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवल्याचा दावाही करायला चंद्रकांत खैरे विसरले नाहीत.

- Advertisement -

विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही खैरेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलू नये, असा टोलाही नाना पटोलेंनी चंद्रकांत खैरेंच्या आडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लगावला आहे. नाना पटोलेंच्या विधानामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतही धुसफूस पाहायला मिळणार आहे. खरं तर यापूर्वीही काँग्रेसचे अनेक आमदार फुटणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला त्यावेळीही काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं. उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसचे अस्लम शेख, अशोक चव्हाण यांच्यासह काही बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु त्यावर अशोक चव्हाणांनीही माध्यमांकडे असा कोणताही विचार नसल्याचा खुलासा केला होता.


हेही वाचाः राजभवनात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते उदय लळीत यांचा सत्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -