घरताज्या घडामोडीनाशिकमधील ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे २२ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

नाशिकमधील ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे २२ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Subscribe

कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात हा:हाकार; परिसरात प्रचंड तणाव

ऑक्सिजन बेड अभावी कोरोना रुग्णांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या टाकीला बुधवारी (दि. २१) गळती लागली. गळतीमुळे अचानकपणे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने तब्बल २२ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहीर केली. पाऊण तासात गळती रोखण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले. दरम्यान, अचानक आलेल्या या संकटामुळे हॉस्पिटलमध्ये एकच हाहाकार उडाला. रुग्णांचे नातेवाईक हंबरडा फोडून रडत असल्याचे अतिशय विदारक चित्र हॉस्पिटलमध्ये पहायला मिळाले.
नाशिक शहरासह संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची प्रचंड चणचण असताना नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीला असलेल्या पाईपलाईनला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे हॉस्पिटलपरिसरात ऑक्सिजनचे पांढरे लोट दिसत होते. याच टाकीतून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. ज्यावेळी गळती सुरु झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील १५ रुग्ण होते. परंतु गळतीमुळे अचानकपणे रुग्णांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. परिणामी तब्बल ११ अंत्यवस्थ रुग्णांचा दुर्देवी अंत झाला. उर्वरित रुग्णांना तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात हलवण्यात आले.

अशी लागली ऑक्सिजनची टाकीला गळती-

टाकीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑक्सिजन भरला जात होता. त्याचवेळी टाकीला जोडलेल्या पाईपलाईमध्ये दाब वाढला. परिणामी पाईपलाईन जोडणारे नोझल तुटले. फुटलेल्या भागातून ऑक्सिजन बाहेर पडू लागला. क्षणार्धात ऑक्सिजनचे पांढरे लोट हॉस्पिटलबाहेर दिसून आले. रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. सुमारे पाऊण तासात गळती थांबवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. पाऊण तासानंतर गळती लागलेल्या नोझलची वेल्डिंग करण्यात आली.

- Advertisement -

ऑक्सिजनचा झाला तुटवडा-

गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर हा अक्सिजन अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना लावण्यात आला होता. परंतु गळतीमुळे हा अक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कोठून उपलब्ध करून द्यावा अशी चिंता लागली आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवताना नाकेनऊ येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा साठा असलेल्या टाकीच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याने घबराहट पसरली आहे.

  • कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला लागली गळती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल नाशिक, ऑक्सिजन, टाकी, डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल, गळती, रुग्णांचे हाल, कोरोना.
  • हॉस्पिटलमध्ये १५७ रुग्ण दाखल आहेत

  • १३२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत

  •  १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

  • काही रुग्णांना बिटको हॉस्पिटलला स्थलांतरीत करण्याचे काम सुरु

नाशिकमधील ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे २२ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -