Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona : औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४२८ रुग्णांची नोंद

Corona : औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४२८ रुग्णांची नोंद

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४२८ रुग्णांची नोंद झाली आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत दिसत असून आजची आकडेवारी ही धडकी भरणारी आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४२८ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले आहेत. तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या आहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ हजार ६२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात २४ तासांत तब्बल १०,५७६ नवे रूग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार ५७६ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ३७ हजार ६०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ५५२ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२ % एवढे झाले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईत आज १३१० नव्या रुग्णांची नोंद; ५८ मृत्यू


- Advertisement -

 

- Advertisment -