घरताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३९१ प्राथमिक शाळामध्ये स्वच्छता उपक्रम, ५ दिवस होणार अभियान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३९१ प्राथमिक शाळामध्ये स्वच्छता उपक्रम, ५ दिवस होणार अभियान

Subscribe

जिल्हा परिषदेच्या विशेष उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३९१ जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वछता अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून ३० ऑक्टोबर पर्यंत स्वछता अभियान सुरू राहणार आहे, या अभियानात सर्वांनी सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे. दरम्यान ओरोस शाळा नं. १ मधे या उपक्रमाचा शानदार शुभारंभ झाला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंर्तगत विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. स्वच्छता अभियान असेल किंवा तंबाखूमुक्त भारत अभियान असेल अशी विविध अभियान राबविताना विदयार्थी व पालकांपर्यत संदेश देण्यासाठी शाळा व  विदयार्थ्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. कोविड १९ साथीच्या पार्श्वभुमीवर साधारणपणे दीड वर्ष शाळा बंद होत्या. मात्र आता कोविड १९ चा प्रादुर्भाव आटोक्यात येत असताना जिल्हयातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील सर्व शाळा व शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व टापटीप व्हावा म्हणून जिल्हा परिषेदेच्या वतीने ठराविक कालावधीमध्ये सर्व शाळामध्ये विशेष स्वच्छता अभियान येणार आहे.

- Advertisement -

‘आमची मुले, आमची शाळा !, आम्ही फुलवू स्वछतेचा मळा!’ हे  अभियानाचे घोषवाक्य राहणार असून हे स्वछता अभियान २५  ते ३० ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ देखील झाला आहे. अभियानात शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, सर्व पालक व ग्रामस्थ

यांनी सहभागी होणे आवश्यक आहे. शाळा, वर्गखोल्या, व्हरांडा, शाळा परिसर स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह यांची स्वछता करण्यात येणार आहे. अभियान काळातील फोटो व अहवाल गट विकास अधिकारी कार्यालयात एकत्रित करावा व अभियान संपल्यानंतर एकत्रित अहवाल जिल्हास्तरावर ५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावा.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष संजना सावंत बोलत होत्या. महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, स्वछता मिशन उपमुख्य कार्यकरी अधिकारी विनायक ठाकूर उपस्थित होते. ओरोस येथील शुभारंभी प्रसंगी जि. प अध्यक्षा संजना सावंत, सभापती अंकुष जाधव, सौ शर्वाणी गावकर, सरपंच प्रिती देसाई, पंस सदस्य सुप्रिया वालावलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी मुस्ताप शेख, शाला व्यव्यस्थापन समिती अध्यक्ष संतोष ओरोसकर, उपसरपंच मनस्वी परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष तानाजी परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमाकांत परब, ग्रामसेवक सरीता धामापूरकर, मंगला ओरोसकर, नागेश ओरोसकर, साक्षी कोचरेकर, ओरोस मुख्याध्यापक सौ सृष्टी मुंडले आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते.

जिल्हा परिषद मध्ये १ नोव्हेंबर रोजी स्वछता मोहीम

जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये १ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद व ओरोस ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वछता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहीती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली.

हायस्कूल मध्ये लसीकरण सुरू

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने संस्था व खासगी हायस्कूल व कॉलेज मधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोव्हक्सीन हा डोस दिला जाणार आहे. जेणेकरून २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस देणे सुलभ होऊ शकेल असेही सौ सावंत यांनी सांगितले.


हेही वाचा : Vaccination : लसीचे दोन डोस घेतलेल्या अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -