घरक्राइमरवी पुजारीच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडून मागितली ५० लाखांची खंडणी, दोघांना अटक

रवी पुजारीच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडून मागितली ५० लाखांची खंडणी, दोघांना अटक

Subscribe

तक्रारीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अमोल मांडवे तसंच, गुन्हे शाखा कक्ष १, काशिमिरा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी रविराज कुराडे आणि अंमलदार यांनी तपास कार्य सुरू केले.

भाईंदर – कुख्यात गुंड रवी पुजारीच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने कर्जतहून अटक केली आहे. भाईंदरमधील दिलीप पोरवाल या बांधकाम व्यावसायिकाला धमकी मिळाली होती.

३० सप्टेंबर रोजी १२ वाजण्याच्या सुमारास भाईंदर येथील व्यावसायिकाल रवी पुजारीच्या नावाने दोन अनोळखी व्यक्तींकडून चिठ्ठीद्वारे ठार मारण्याची धमकी मिळाली होती. तसंच, ५० लाखांची खंडणीची मागणी केली आहे. त्यानुसार, भाईंदर पोलीस ठाण्यात धमकीबाबत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

तक्रारीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अमोल मांडवे तसंच, गुन्हे शाखा कक्ष १, काशिमिरा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी रविराज कुराडे आणि अंमलदार यांनी तपास कार्य सुरू केले. यानुसार, ३ पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. त्यानुसार सदर पथकाला महत्वाचे धागेदोरे मिळाले. मिळालेल्या या माहितीवरून आरोपी मोहम्मद इक्बाल मोहम्मद अली शेख (४९, रा. मरोळ नाका), लॉरेन्स लिओ चेट्टीयार (साकिनाका) यांना कशेळे, ता. कर्जत जिल्हा रायगड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्हयांचा पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त सदानंद दाते, विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस निरीक्षक राहुल राख, सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, नितीन बेंद्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, चंद्रकांत पोशिरकर, सहायक फौजदार राजू तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडिले, पोलीस हवालदार संजय पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, विजय गायकवाड, मुस्तकीम पठाण, राजवीर संधू, गोवीद केंद्रे, शिवाजी पाटील, पोलीस नाईक राजाराम काळे, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, विकास राजपुत, समिर यादव, महेश वेल्हे, सुशिल पवार, अनिल नागरे, जयकुमार राठोड असे गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ व मध्यवर्ती गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार तसेच सहायक फौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी पार पाडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -