घरमनोरंजनप्रियांका-निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध

प्रियांका-निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध

Subscribe

दीपिका पादुकोन-रणवीर सिंगच्या लग्नानंतर अवघ्या बॉलिवूडचे लक्ष प्रियांका-निकच्या लग्नाकडे लागले होते. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस हॉटेलमध्ये दोघांचाही ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला आहे. लग्नानंतर फटाक्यांची आतषबाजी केली गेली. डिझायनर राल्फ रॉलेन याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केलेला आहे. यात त्याने म्हटले आहे की, प्रियांकाने कस्टम राल्फ लॉरेन गाऊन घातला असून निकने पर्पल रंगाचा कोट घातला होता. तसेच लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांनी राल्फ लॉरेनने डिझाईन केलेले कपडे घातले होते. आज ख्रिश्चन पद्धतीने विवाह केल्यानंतर आता उद्या हिंदू पद्धतीनुसार प्रियांका आणि निक लग्न करणार आहेत.

 

- Advertisement -

लग्नाचा रिसेप्शन सोहळादेखील ग्रँड असणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिला रिसेप्शन सोहळा मुंबईत सिनेसृष्टीतील मित्रमंडळींसाठी देणार असून दुसरा सोहळा हा दिल्लीत पार पडणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -