घरमहाराष्ट्रदोषी असतील तर एम. जे. अकबरांवर कारवाई व्हावी- रामदास आठवले

दोषी असतील तर एम. जे. अकबरांवर कारवाई व्हावी- रामदास आठवले

Subscribe

मीटू मोहिमेत आरोप झालेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम जे अकबर यांनी राजीनामा दिला. त्याच्या राजीनाम्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. एम जे अकबर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी असे मत आठवले यांनी मांडले आहे.

मीटू मोहिमेअंतर्गत आरोप झालेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजिनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजिनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजिनामा देऊन योग्यच केले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात ते दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई देखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरातील रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माझ्यावर कधीच असे आरोप लोगणार नाही

रामदास आठवले यांनी सांगितले आहे की, ‘मी-टू’ मोहिमेतील सर्वच आरोप खोटे असतील असे नाही. काही जण इतरांची बदनामी करण्यासाठी असे करत देखील असतील. मात्र दुर्लक्ष करण्याजोगे हे आरोप नाहीत. एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य असावे, असा अंदाज लावण्यात येत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे आठवले यांनी सांगितले. मी नितीमत्तेचे पालन करणारा असल्यामुळे माझ्यावर कधीच असे आरोप लागणार नाही, असा देखील दावा आठवले यांनी केला आहे.

- Advertisement -

संघाला शस्त्रपूजनाचा अधिकार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान होणा-या शस्त्रपूजनाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र शस्त्रपूजन हा परंपरेचा भाग आहे. त्यात गैर काहीच नाही. संघाला परंपरेचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या मुद्द्याचे भांडवल करुन संघावर आरोप करणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी आरोप करणाऱ्या इतर संघटनांना चिमटा काढला आहे.

लोकसभेच्या तीन जागा पाहिजेत

आगामी लोकसभा निवडणूकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या ‘आरपीआय’च्या उमेदवारांना राज्यात तीन जागा मिळायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: मी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन उत्सुक आहे. तर विदर्भात एक जागा मिळायला हवी. आम्ही यंदा बहुजन व्यतिरिक्त इतर समाजातील उमेदवारांना देखील तिकीट देऊ, असे आठवले यांनी स्पष्ट केले. दरम्यान एमआयएम’ व भारिप बहुजन महासंघाच्या युतीवर बोलताना त्यांनी सांगितले की, असल्या युतीमुळे राज्यात ‘रालोआ’ला काहीही फरक पडणार नाही. उलट कॉंग्रेसला याचा फटका बसेल आणि आम्हाला फायदाच होईल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -