घरमहाराष्ट्र...म्हणून तिवरे धरण फुटले, तानाजी सावंतांनी सांगितले कारण!

…म्हणून तिवरे धरण फुटले, तानाजी सावंतांनी सांगितले कारण!

Subscribe

मुंबई – आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 नुसार प्रस्ताव मांडला. यावेळी विरोधी पक्षांनी पूर, शेतकरी आत्महत्या आणि अतिवृष्टी विषयी भाष्य केले. याव प्रस्तावावर बोलत असताना आमदार एकनाथ खडसेयांनी  शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना खेकड्याने तिवरे धरण फोडल्याच्या घटनेवरून टोला हानला. यावर तानाजी सावंत यांनी आज स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले तानाजी सावंत –

- Advertisement -

जसा उन्हाळा वाढत जातो तशी खेड्याच्या प्रजाती त्यांची पिल्ले ओल असेल तशी खाली खाली होल तयार करत जातात. उन्हाळा जितका तीव्र तितके ते खोलपर्यंत जातात. पाऊस काय सांगून येत नाही. पाणी आल्या बरोबर ते पाणी त्या होलात जाऊन पाण्याच्या प्रेशने तो पाझर लावाचा बांध फुटतो हे तांत्रीक उदाहरण आहे. हे मेरीच्या आहवालात आहे.
मी त्या ठीकाणी असे होऊशकते तीवऱ्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असे मी म्हंटले होते.

दिले दुसरेही उदाहरण –

मी एक इंजीनियर आहे. तांत्रीक दृष्या मी त्यावर भाष्य केले होते. यामध्ये अशा पाझर तलावर झाडी असेल. 15 ते 20 वर्षाचे जूनी झाडे बांदावर असतात. झाड जर वरून आपण तोडले तर त्याच्यामुळ्या त्या बांधावरून खाली गेलेल्या असतात त्या कॅवेटी तयार करतात. आतले मटरेल निघून जाते आणि पाण्याचा लोंढा ज्यावेळी येतो. पाण्याची उर्जेमुळे हाय प्रेशर असते. ती मुळी पाण्यासाठी पाईपचे काम करते त्यातून पाणी खाली जाते आणि पाण्याच्या प्रेशर मुळे तो बांध फाटतो.  मेरीने दिलेल्या अहवालात हे कारण दिले आहे, असे तानाजी सावंत म्हणाले.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -