बीड जिल्ह्यातील पाटोदा मांजरसुभा येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; 6 जण जागीच दगावले

बीड जिल्ह्यातील पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोद्या जवळ बादमळे वस्ती येसे स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा दुर्देवी अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जण जागीच दगावले आहेत.

बीड जिल्ह्यातील पाटोदा मांजरसुभा रोडवरील पाटोळ्याजवळ स्विफ्ट कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, त्यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोद्याजवळ बादमळे वस्ती येथे हा अपघात झाला. घटनास्थळी पाटोदा पोलिस व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले असून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. हा अपघात जेव्हा झाला त्यावेळी कार आणि टेम्पोच्या धडकेचा मोठा आवाज झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर रस्त्यावरील इतर वाहनधारकांनी अपघातातील जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दुसरा मोठा अपघात
रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

तर दुसरीकडे, शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे देखील आज निधन झाले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते.

 


हेही वाचा :शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे कारच्या भीषण अपघातात निधन