घरमहाराष्ट्रअदानी समूहामागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा; मुंबई विमानतळाच्या खात्यांची चौकशी सुरू

अदानी समूहामागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा; मुंबई विमानतळाच्या खात्यांची चौकशी सुरू

Subscribe

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या खात्यांची चौकशी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील अदानी समूहाच्या दोन विमानतळांचे खाते तपासत आहेत.

Gautam Adani: अब्जाधीश गौतम अदानी एंटरप्राईजसची चौकशी करण्यात येत आहे. गौतम अदानी यांच्यावर संकटांची मालिका सुरू आहे. आरोपींची राळ त्यांच्यावर उठली आहे. आता त्यांच्या मागे आणखी एका चौकशीचा फास आवळण्यात आला आहे. अदांनी एंटरप्रायझेसने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला कळवले की कॉर्पोरेट मंत्रालय मुंबईतील समूहाच्या दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी करत आहे. (Adani Group to be re investigated Investigation into the accounts of Mumbai airport is underway)

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या खात्यांची चौकशी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबईतील अदानी समूहाच्या दोन विमानतळांचे खाते तपासत आहेत.

- Advertisement -

मंत्रालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आर्थिक वर्षे 2017-18 ते आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत माहिती आणि कागदपत्रे मागवली आहेत. अदानी समुहाने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याआधी फेब्रुवारीमध्येही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अदानी समूहाची चौकशी सुरू केली होती.

जानेवारी 2023 मध्येच अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालाद्वारे कंपनीला मोठा धक्का दिला होता. अदानी समुहाने हिंडेनबर्गचे स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचे आरोप फेटाळले होते पण या धक्क्याचा फटका कंपनीच्या शेअर्सना बसला होता.

- Advertisement -

अदानी समूहाजवळ किती विमानतळ?

अदानी समूहाचे देशात सात विमानतळ असून त्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही समावेश आहे. हे विमानतळ 2021 मध्ये अदानी समूहाने विकत घेतले होते. यापूर्वी 2019 मध्ये, सरकारच्या पहिल्या खासगीकरण मोहिमेदरम्यान, अदानी समूहाला सहा विमानतळ मिळाली होती. याशिवाय नवी मुंबईत नवीन विमानतळ बांधण्याचं काम सुरू आहे.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण

सर्वोच्च न्यायालयात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या सुनावणीमुळे काल अदानी समूहाचे शेअर्स घसरताना दिसत होते. दरम्यान, अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सवर दबाव होता आणि तो 3 टक्क्यांहून अधिक घसरला.

(हेही वाचा: शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक; कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी – वडेट्टीवार )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -