घरताज्या घडामोडीशालेय शिक्षण खाते केसरकरांकडे गेल्यावर मला सुखद धक्का बसला, आदित्य ठाकरेंची टीका

शालेय शिक्षण खाते केसरकरांकडे गेल्यावर मला सुखद धक्का बसला, आदित्य ठाकरेंची टीका

Subscribe

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरू आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप केला जातोय. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप करण्यात आले. यावेळी खातेवाटपावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शालेय शिक्षण खाते कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आले आहे. परंतु हे खाते केसरकरांनी स्वीकारलं तेव्हा मला सुखद धक्का बसला, असं म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे.

मी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मला हे खातं न घेण्याबाबत प्रेमाचे सल्ले दिले होते. शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. देशात शिक्षणाचा अधिकार आहे. परंतु दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला पाहीजे. आपल्या देशाला सुपर पॉवर बनवायचं असेल तर हे स्वप्न केवळ शिक्षणाच्या जोरावर पूर्ण होऊ शकतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शालेय शिक्षणावर बोलताना प्रामुख्याने तीन गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. विकास, अभ्यासक्रम, कौशल्य अभ्यासक्रम. शाळांच्या इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटी नसते. दरवाजे तुटलेले असतात. बाथरूम खराब असतात. वर्ग काळोखात असतात, याकडे लक्ष दिले पाहीजे. पुरेसा प्रकाश वर्गात आहे का हे पाहिले पाहीजे. प्रत्येक शाळेत कॅन्टीन असणे गरजेचे आहे. तसेच शिक्षक, स्टाफसाठी बसण्याची योग्य ती व्यवस्था असावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शालेय इमारतीचा विकास करताना ही मैदानं तयार होतील यावर भर दिला पाहिजे. मुंबईच्या शाळेत आम्ही विविध प्रकारच्या सुविधा दिल्या. यंदा महापालिकेच्या शाळेत एक लाख विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त झाली आहे. जे आपले शिक्षक आहेत त्यांना वारंवार ट्रेनिंग दिले पाहीजे. हेडमास्तरांना काही प्रमाणात आर्थिक निर्णय घेण्याची ताकीद दिली पाहीजे, असं ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्री गुंडाना संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी, एकनाथ खडसेंचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -