घरताज्या घडामोडीशून्यावर गेलो तरी पुढच्या निवडणुकीत १४० जागा जिंकून दाखवू, आदित्य ठाकरेंना विश्वास

शून्यावर गेलो तरी पुढच्या निवडणुकीत १४० जागा जिंकून दाखवू, आदित्य ठाकरेंना विश्वास

Subscribe

ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीचे दंड थोपाटण्यास सुरूवात केली आहे. आगामी निवडणुकीत आमचे १४० आमदार निवडून येणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही नक्की काय चूक केली? त्यांची काहीतरी अडचण असेल. ते सुरतेला पळून गेले. गुवाहाटीला गेले. नंतर गोव्याला गेले.

हे बंडखोर आमदार गोव्याला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जेव्हा राजीनामा दिला. तेव्हा बंडखोर आमदार टेबलावर चढून हातवारे करून नाचले. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. म्हणूनच मला सतत वाटते की, चाळीस गेले तरी चालतील. आम्ही शून्यावर जरी गेलो तरी पुढच्या निवडणुकीत १४० जागा जिंकून दाखवू, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

- Advertisement -

आम्ही ४० आमदारांना सर्वकाही दिलं. सामाजिक, राजकीय ओळख दिली. सर्व महत्त्वाची खाती दिली. पक्षाला फोडणे किती योग्य आहे. पक्ष फोडून परिवार संपवणे किती योग्य आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खुलास्यावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शपथविधीबाबतच्या भाष्यावर विश्लेषण करणार नाही. आमच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण महाविकासआघाडीची स्थापना झाल्यापासून शरद पवार आणि अजित पवार आमच्यासोबत आणि पाठीशी आहेत, जे सत्य आहे ते लोकांसमोरच आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दीष्ट : मुख्यमंत्री एकनाथ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -