राज्यात नक्की कोण मुख्यमंत्री?,आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

mva shivsena aditya thackeray, bjp, devendra fadanvis, tata airbus project

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंचा शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला अजापासून सुरूवात झाली. आदित्य ठाकरेंनी सावंतवाडीत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. हे सर्व एक दीड महिन्याचे नाटक असून तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. राज्यात दोन लोकांचे जंबो मंत्रीमंडळ आहे. या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही, असा टोला लगावला.

हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार –

संवाद यात्रेत बोलताना हे सर्व एक दीड महिन्याचे आहे, तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम सुरू केले तेव्हा पहिले काम कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला, असे आदित्य ठाकरे म्हणाले

आतापर्यंत राज्यात इतके घाणेरडे राजकारण पाहिले नाही –

सध्या दोन लोकांचे जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचे लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतके घाणेरडे राजकारण पाहिले नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

ज्याने तुम्हाला राजकीय ओळख दिली त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला –

पुढे बोलताना पक्ष फोडा, गद्दारी करा, ज्या माणसाने तुम्हाला घडवले, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळे काही दिले त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणे ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती. मी आज तुम्हाला इतकेच विचारायला आलो आहे की, हे घाणेरडे राजकारण तुम्हाला पटतंय का? हे सरकार बेकायदेशीर तर आहेच, पण हे गद्दार आणि बेईमानांचे सरकार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले

तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल –

इथून २० आमदार फोडा, तिथून ३० आमदार फोडा, तिथून पाचचा गट घ्या अशी सरकारे बनायला लागली तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल याचा विचार करा. आज देशात बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, असेही ठाकरेंनी नमूद केले.

गोव्यात टेबलावर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का ? – आदित्य ठाकरे

शिवसेनेशी उद्धव साहेबांशी गद्दारी करून सरकार स्थापन केले . पण गद्दारी करणाऱ्या या सर्वांना सगळ दिले, काही कमी केले नाही. गोव्यात टेबलावर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का? शिवसेनेचे उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना डोक्यावर उलून घेतले , त्यांच्यावर उपकार करूनही पाठीत खंजीर का खुपसला? वार करायचा होता तर छातीवर करायचा होता. उद्धव ठाकरे आजारी असताना खंजीर खुपसला हे दुख आहे. मला कुणाची लायकी काढायची नाही. कारण ते माझे वय काढतील. तुम्हाला रहायचे आहे तिकडेच रहा, लाज बाळगा. पण ज्या गद्दारांना थोडीतरी लाज असेल त्यांनी परत यावे आमचे मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. सत्य जिकंत की सत्ता जिकंते हे मला पहायचे आहे. एका गगद्दाराचा मला मेसेज आला, गद्दार म्हणून नका विश्वास घातकी बोला. हे गद्दार म्हणजे गद्दारचे. जेव्हा माणूस आजारी होता, हलू शकत नव्हता त्यावेळी गद्दारांनी हे कृत्य केले. त्यावेळी गद्दारांचे नेते पक्ष फोडत होते. वाईट काळात हे ४० गद्दार आम्हाला संभाळतील अशी आशा होती. हे गद्दार आमचे नाही, घरातल्यांचे नाही झाले, ते तमचे काय होणार ? आम्ही पून्हा पून्हा चूक करू पण शिवसैनिकांवर प्रेम देऊ . हे झुकले, त्यांनी सर्व विकले, पण शिवसेना नावावर चालते . पैसा येतो जातो पून्हा येतो , हे ब्रिद वाक्य माझ्या पंजोबांनी बाळासाहेबांना दिले, त्यांनी आम्हाला दिले, ते आम्ही पुढे नेऊ . यादुखातून, गद्दारीतून पुढे जायचे असेल तर मला तुमची साथ हवी आशिर्वाद हवा म्हणत आदित्य ठाकरे यांनी कोकण वासीयांना साथ घातली .

राज्यपालांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी घेतला समाचार

या देशात बेरोजगारी, महागाई वाढत आहे . पण महाराष्ट्रा विरोधी राजकारण सुरू आहे . राज्यपालांनी केलेले वक्तव्य म्हणजे मुंबई ठाणे हे त्यांनी मुददाम नावे घेतली. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात कुठे धर्मं धर्मांमध्ये भांडण झाली नाहीत . हिंदुत्व पुढे नेत सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शिवसेने केला होता. पण अशी वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषध केला.