घरताज्या घडामोडीपुण्यात रिक्षा संघटनेचे आंदोलन यशस्वी; ओला, उबेरची बाइक टॅक्सी सेवा बंद

पुण्यात रिक्षा संघटनेचे आंदोलन यशस्वी; ओला, उबेरची बाइक टॅक्सी सेवा बंद

Subscribe

पुण्यात बाईक टॅक्सी सेवा विरोधात रिक्षा चालकांनी केलेल आंदोलन यशस्वी झाले आहे. रिक्षा चालकांनी सोमवारी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले होते. रिक्षा चलकांच्या या आंदोलनानंतर ओला आणि उबेर कंपनीने त्यांची बाइक टॅक्सी ऑनलाइन सेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळते.

पुण्यात बाईक टॅक्सी सेवा विरोधात रिक्षा चालकांनी केलेल आंदोलन यशस्वी झाले आहे. रिक्षा चालकांनी सोमवारी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले होते. रिक्षा चलकांच्या या आंदोलनानंतर ओला आणि उबेर कंपनीने त्यांची बाइक टॅक्सी ऑनलाइन सेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळते. परंतु, रॅपीडो कंपनीची ऑनलाइन सेवा अद्याप बंद न झाल्याने रिक्षाचालक आंदोलनावर ठाम आहे. (after aggressive agitation by rickshaw association pune rickshaw bandh protest bike taxi services of ola uber stopped)

सोमवारी रिक्षा चालक आंदोलकांशी चर्चा करण्यात आली मात्र, मार्ग निघाला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. रिक्षा बंद असल्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांचे हाल झाले असून, वाहतुकीचा भार पीएमपीच्या बसवर येऊन पडला आहे. या आंदोलनामुळे पुण्यातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

- Advertisement -

पुण्यात बाईक टॅक्सीला विरोध करत २८ नोव्हेंबरला पुण्यात रिक्षा संघटनांनी एकत्र येत बंद पुकारला होता. दरम्यान, यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती नेमून या संदर्भात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यावेळी आंदोनल मागे घेण्यात आले होते. मात्र, याला दोन आठवडे उलटूनही सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याने, पुण्यातील रिक्षा संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत.

पुण्यात रिक्षा संघटनांनी आंदोलन केले. विशेष म्हणजे संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक जमले आणि त्यांनी आपल्या रिक्षा तिथेच सोडत पुन्हा घरी गेले.

- Advertisement -

दरम्यान, रिक्षा चालकांनी बाइक टॅक्सी विरोधात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवारी रात्री पासून ओला, उबेर यांनी त्यांची सेवा बंद केली आहे. परंतु, रॅपीडो कंपनीची सेवा अद्याप सुरु आहे. बाईक टॅक्सी सेवेला परवानगी नसताना बेकायदेशीर सेवा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे ही ऑनलाइन अॅप सेवा बंद करावी अशी मागणी पुणे सायबर पोलीसांनी गुगलकडे केली आहे. पोलीसांनी ऑनलाइन बाइक टॅक्सी सेवावर गुन्हे दाखल करु असेही आश्वासन दिले”, अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे नेते डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली.


हेही वाचा – चीनने पुन्हा कुरापत काढली तर सडेतोड उत्तर मिळेल; संरक्षण मंत्र्यांची संसदेत ग्वाही

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -