घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधनुष्यबाणानंतर आता पालिकेतील दालनही सील, ठाकरे-शिंदे गटातील वाद शिगेला

धनुष्यबाणानंतर आता पालिकेतील दालनही सील, ठाकरे-शिंदे गटातील वाद शिगेला

Subscribe

नाशिक : शिवसेनेतील अभूतपूर्व फूट आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतर यासगळ्या घडामोडींचे परिणाम दिल्ली ते गल्ली उमटत आहेत. नाशिक महानगर पालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांची शिवसेना पुरस्कृत संघटनेच्या बाबतही असाच वाद संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निर्माण झाला आहे. म्युन्सीपल कामगार कर्मचारी सेनेच्या अध्यक्ष पदी प्रवीण तिदमे होते. मात्र, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने लागलीच संघटनेचे संस्थापक बबन घोलप यांनी विशेष सभा बोलवत अध्यक्ष पदाची माळ सुधाकर बडगुजर यांच्या गळ्यात टाकली. या संघटनेला महानगरपालिका मुख्यालयात एक दालन देण्यात आले आहे. बडगुजर यांनी दोनच दिवसापूर्वी या दालनात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. परंतु, दालनाच्या मुद्द्यावरून पुन्हा नव्याने वाद निर्माण होऊन संघर्ष होऊ शकतो. याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाने हे दालनच सील केले आहे.

प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर म्युन्सीपल कामगार कर्मचारी सेनेचे संस्थापक माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तडकाफडकी त्यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली. ही सभा महानगरपालिका मुख्यालयात होणार होती मात्र तेव्हाही परवानगी नाकारण्यात आल्याने ती सभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आली होती. याच सर्वसाधारण सभेत ठराव संमत करत सुधाकर बडगुजर यांची संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, प्रवीण तिदमे यांनी पदाधिकाऱ्यांच्या सह्यांच्या आधारे कामगार आयुक्तालयात धाव घेत आपणच अध्यक्ष असल्याचा दावा केला. त्याच सोबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेली वार्षिक सर्वसाधारण सभाच बेकायदेशीर असल्याचाही दावा केला होता. यामुळे अध्यक्षपदाचा हा सगळा मुद्दा वादात आणि कायदेशीर कचाट्यात सापडला. शुक्रवारी (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात आपल्या पहिल्या कार्यलयाचे उद्घाटन करत असतानाच ठाकरे गटाचे बडगुजर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत महानगरपालिकेतील म्युन्सीपल कामगार कर्मचारी सेनेच्या दालनात प्रवेश करत अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.

याबाबत तिदमे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या दालनाचा बडगुजर व दीडशे लोकांनी बेकायदेशीररित्या ताबा घेतला आहे. तसेच अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे गहाळ केली असल्याची तक्रार दिली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करत बडगुजर यांना चौकशीसाठी पाचारण केले. त्याचसोबत अध्यक्षपद तसेच दालन याबाबत न्यायालयात दाद मागावी असे कळवले आहे.

- Advertisement -

दरम्यान, दोन्ही गटातील या वादमुळे कोणताही संघर्ष निर्माण होऊ नये. तसेच अध्यक्षपद व दालन याबाबत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत म्युन्सीपल कामगार कर्मचारी सेनेचे महानगरपालिका मुख्यालयातील दालन सील करण्याचा निर्णय घेत सोमवारी (दि.२४) पोलीस प्रशासनाने हे कार्यालय सील केले. कार्यालय सील झाल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -