घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंच्या अग्रदूत बंगल्याचा वीजपुरवठा खंडित! बेस्ट कर्मचाऱ्यांकडून काम सुरु

मुख्यमंत्री शिंदेंच्या अग्रदूत बंगल्याचा वीजपुरवठा खंडित! बेस्ट कर्मचाऱ्यांकडून काम सुरु

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्याती वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्या बंगल्याला तात्पुरत्या स्वरुवपात दुसरीकडून वीज देण्यात आली आहे. बेस्टची केबल जळाल्याने बत्ती गुल झाली आहे. दरम्यान बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. दरम्यान बेस्ट सेवा ही महापालिकेच्या अखत्यारित येते आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अग्रदूत बंगल्यासमोर 5 फूटांचा खड्डा खोदण्यात आल होता. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन 2 ते 3 दिवस लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. बेस्टची मेन केबल जळाल्यामुळे ती पूर्णपणे काढून दुसरी लावण्यात येणार आहे, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांना हा अग्रदूत शासकीय बंगला मिळाला होता. आताही हा बंगला मुख्यमंत्र्याकडेच आहे. यासोबत या बंगल्याच्या बाजूचा नंदनवन हा शासकीय बंगला देखील त्यांच्याकडेच आहे. या सर्व बंगल्यांना बेस्ट उपक्रमाकडून (Brihanmumbai Electric Supply and Transport) वीजपुरवठा केला जातो. मात्र अग्रदूत बंगल्याला वीजरपुरवठा करणारी बेस्टची केबल जळाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येतो. यात मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. असे असताना चक्क मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यात लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत.

- Advertisement -

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंड केले, या शिंदेग गटाने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सध्या शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आहे.


एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -