घरमहाराष्ट्रभाजप पदाधिकाऱ्याला दणका; महिलेविरुद्ध केलेले वक्तव्य भोवले, भरावे लागणार 1 कोटी

भाजप पदाधिकाऱ्याला दणका; महिलेविरुद्ध केलेले वक्तव्य भोवले, भरावे लागणार 1 कोटी

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी जनतेमध्ये आपल्याबद्दल अपप्रचार करुन बदनामी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात मे 2021 मध्ये अवमान याचिका दाखल केली होती. याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी प्रकाश चित्ते यांनी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी जनतेमध्ये आपल्याबद्दल अपप्रचार करुन बदनामी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात मे 2021 मध्ये अवमान याचिका दाखल केली होती. याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी प्रकाश चित्ते यांनी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयाने हा आदेश दिला आहे.  ( Ahmednagar news BJP leader Praksh Chitte have to pay 1 crore for defamation case filed by Auradha Adika )

चित्ते यांच्याविरोधात आदिक यांनी 2021 मध्ये 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केला होता. त्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. चित्ते यांनी आदिक यांची बदनामी केल्याचं सिद्ध होत असल्याने एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी दिला आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

श्रीरामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात बसवण्याच्या प्रकरणातून हा वाद निर्माण झाला होता. त्यावर्षीच्या शिवजंयतीला यावरुन आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात सहभाग घेतलेले चित्ते यांनी पत्रकारांशी बोलताना आदिक यांच्याविरोधात आरोप केले होते. पुतळ्याची जागा तत्कालीन नगराध्यक्ष आदिक यांच्याकडून बदलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप चित्ते यांनी केला होता. त्यातून आपली बदनामी झाल्याचा दावा आदिक यांनी 2021 ला दाखल केला होता.

( हेही वाचा: गोळ्या झाडण्याचे आदेश मॉरिशसमधून नाही तर मातोश्रीवरून, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार )

- Advertisement -

अनुराधा आदिक यांचा पुतळा प्रकरणी काहीही संबंध नाही

अनुराधा आदिक यांचे वकील अ‌ॅड. तुषार आदिक यांनी या खटल्याबद्दल सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवादी चौकात बसवण्याबाबत अंतिम मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. असे असताना शिवजयंतीच्या दिवशी 21 मार्च 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही लोकांनी नियमबाह्य पद्धतीने पुतळा आणून बसवला. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तो पुतळा तिथून हटवला. परंतु, अनुराधा आदिक यांचा काहीही संबंध नसताना, त्यांच्यावर खोटे आरोप करत, त्यांची बदनामी करण्यात आल्याचं तुषार आदिक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -