आक्रमक अजितदादा लहाणपणी होते लाजाळू; क्रिकेट आणि पतंग उडावण्यात होते तरबेज

ajit pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. अजित पवार यांची ओळख ही आक्रमक, स्पष्ट बोलणारे म्हणून आहे. मात्र, हेच अजित पवार लहाणपणी प्रचंड लाजाळू होते. तसंच, ते क्रिकेट, गोट्या आणि पतंग उडवण्यात तरबेज होते. याची माहिती त्यांची मोठी बहिण डॉ. रजनी इंदुलकर यांनी ही माहिती दिली.

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वभावातील बिनधास्तपणा सर्वांना ज्ञात आहे. अजित पवार यांची मोठी बहिण डॉ. रजनी इंदुलकर यांनी यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या. अजित पवार हे लहानपणी प्रचंड लाजाळू होते. एवढे की, बहिणींची ओळख करुन द्यायलाही ते लाजायचे. त्यांच्या या स्वभावाकडे पाहिलं तर भविष्यात ते नेता होतील असं अजिबात वाटलं नव्हतं, असं इंदुलकर यांनी सांगितलं.

डॉ. रजनी इंदुलकर यांनी अजित पवार यांच्या क्रीडाप्रेमाचीही आठवण सांगितली. अजित पवार यांचे क्रीडाप्रेम हे बालपणापासूनचे, याविषयी रजनीताई सांगातात, अजित पवार यांना खेळाची भारी हौस होती. कोणतीही क्रिकेटची मॅच ते चुकवायचे नाहीत. क्रिकेटच काय, तर पतंग उडविण्यात आणि गोट्या खेळण्यात ते खुप रमायचे, असं इंदुलकर यांनी सांगितलं. तसंच, अजित पवार यांनी अभ्यासाचा ताण कधी मनावर घेतला नाही. शाळेत ते भरपूर मस्ती करायचे, असं रजनीताई यांनी सांगितलं.