घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजितदादांची गैरहजेरी; म्हणाले, मी दिल्लीत...

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजितदादांची गैरहजेरी; म्हणाले, मी दिल्लीत…

Subscribe

मुंबईः मी दिल्लीला गेलेलो नाही. मी रिचेबल आहे. सध्या पुण्याला जात आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी tv9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा शरद पवार यांनी शुक्रवारी केली. खास पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी हे जाहिर केले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळे, फ्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार ह्यादेखील शरद पवार यांच्या सोबत होत्या. जयंत पाटील या पत्रकार परिषदेला उशीरा पोहोचले. शरद पवार यांनी खास त्यांच्यासाठी पत्रकार परिषद थांबवली होती. जयंत पाटील आल्यानंतरच पत्रकार परिषद सुरु झाली.

- Advertisement -

अजित पवार हे पत्रकार परिषदेला नसल्याने तेथे दबक्या आवाजात चर्चाही सुरु झाली. अजित पवार हे पत्रकार परिषदेला का नाहीत, असा प्रश्नही शरद पवार यांना विचारण्यात आला. प्रत्येक ठिकाणी सर्व नेते नसतात. अजित पवार हे दिल्लीला गेले नाहीत, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले, याची जोरदार चर्चा सुर झाली. कारण शरद पवार यांनी राजीनामा जाहिर केल्यानंतर अजित पवार हे एकमेव होते, ज्यांनी या राजीनाम्याचे समर्थन केले होते. शरद पवार यांनी राजीनामा सांगितल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनाला बसले होते. त्यांनाही दादांनी दरडावले होते. साहेब राजीनामा देत आहेत म्हणजे ते राजकारण सोडत आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांच्या नेतृत्त्वाचं पक्ष चालणार आहे, अशी समजूत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची काढली होती.

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर वेगळी भूमिका मांडणारे अजित पवार पत्रकार परिषदेलाच नसल्याने एकच चर्चा सुरु झाली होती. मात्र अजित पवार यांनी tv9 या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देऊन चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र दौरा करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -