घरताज्या घडामोडी'हे' वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांची पाटलांवर टीका

‘हे’ वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांची पाटलांवर टीका

Subscribe

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आई-वडिलांवरील वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांबरोबर शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटलांसारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या मंत्र्यांनी अशा प्रकरची वक्तव्यं करु नये. त्यांना यंदा कमी दर्जाचं मंत्रिपद मिळालं आहे म्हणून कदाचित ते नाराज असतील.

- Advertisement -

महाराष्ट्रात नाही तर कुठेच कोणी कोणाला शिव्या देऊ नये. शिव्या देऊन नोकरी लागणार नाही आणि महागाईदेखील कमी होणार नाही आहे, असंही अजित पवार म्हणाले.

आई-वडिलांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं – जयंत पाटील

- Advertisement -

नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे राजकारणी आहेत. त्यांची आई-वडिलांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं असल्याचे मत जयंत पाटील यांनी मांडले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदावर निवड झाल्यावर पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले की, आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही. आईवरून शिव्या देणं ही आमची कोल्हापूरची पद्धत आहे. परंतु मोदी आणि शाहांना शिव्या देणं मी सहन करू शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नाशिकमध्ये झालेला अपघात भीषण आहे. त्यासंदर्भात सगळी माहिती घेत मी ट्वीटदेखील केलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी देखील अपघाताच्या स्थळाला भेट देऊन पाहाणी केली आहे.12 लोक मृत्युमुखी पडले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी दुख:द आहे, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : मोदी, शाहांची तुलना आई-वडिलांशी करणं चुकीचं; जयंत पाटलांचा पलटवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -