घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजपकडून अजित पवारांचा पुतळा दहन; संभाजी महाराजांच्याबाबत वक्तव्यावरुन राजकारण तापलं

भाजपकडून अजित पवारांचा पुतळा दहन; संभाजी महाराजांच्याबाबत वक्तव्यावरुन राजकारण तापलं

Subscribe

नाशिक : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं असून नाशिक शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अजित पवार यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला. भाजपने रविवार कारंजा येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करत अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवारांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजपच्यावतीने रविवार कारंजा आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार हाय हाय, अजित पवारांचा निषेध असो, धर्मवीर संभाजीराजेंचा विजय असो, धर्मद्रोही राष्ट्रवादीचा धिक्कार असो, राजीनामा द्या राजीनामा द्या अजित पवार राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. रविवार कारंजा येथे झालेल्या आंदोलन प्रसंगी अजित पवार यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. या आंदोलनाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ.देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, काशिनाथ शिलेदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे,महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, सुनिल देसाई, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, अ‍ॅड.अजिंक्य साने, स्वाती भामरे, प्रतिक शुक्ल, योगेश हिरे, प्रा.कुणाल वाघ, तुषार भोसले, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, नंदकुमार देसाई,महेश सदावर्ते, वसंत उशीर, विजय बनछोडे, धनंजय पळसेकर आदी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी हिंदू विरोधात भूमिका घेतली आहे. अधिवेशना दरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती संभाजीराजेंनी हिंदू राष्ट्रसाठी, हिंदू समाजाच्या हितासाठी काम केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. : आ.देवयानी फरांदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -