घरमहाराष्ट्रमुंढेंच्या जागी धीरजकुमार, तर कल्याणकर नवे कोकण विभागीय आयुक्त

मुंढेंच्या जागी धीरजकुमार, तर कल्याणकर नवे कोकण विभागीय आयुक्त

Subscribe

Transfer of IAS officers | शुक्रवारी 6 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर आता पुन्हा तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे.

मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडताच सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून आयएएसच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी 6 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर आता पुन्हा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिव असलेले डी.बी.गावडे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर, रायगडच्या जिल्हाधिकारीपदी असलेले डॉ.महेंद्र कल्याणकर यांना कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. तसंच, तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेले आरोग्य सेवा आणि कुटुंब कल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तपदी आता धीरज कुमार यांची बदली करण्यात आली आहे. तर, सौरभ विजय यांच्याकडील सांस्कृतिक कार्य विभागाचा पदभार काढून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

- Advertisement -

डी.बी गावडे आणि डॉ. महेंद्र कल्याणकर हे २००७ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तर, धीरज कुमार हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते २०१८ पासून उत्तर प्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर होते.

- Advertisement -

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत. ५ ऑगस्ट रोजी ३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, डॉ. विजय सूर्यवंशी, सुशील खोडवेकर यांचा समावेश होता.

हेही वाचा – राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; डॉ. विजय सूर्यवंशी MMRDAचे अतिरिक्त आयुक्त

त्यानंतर, २९ सप्टेंबर रोजी पुन्हा ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा तब्बल 44 वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या घाउक बदल्या केल्या होत्या.

हेही वाचा – शिंदे सरकारकडून राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

३ नोव्हेंबरमध्येही चार आयएएसच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आशिष कुमार सिंग, आभा शुक्ला, दिनेश टी.वाघमारे,परराग जैन नैनुतिया आदी सनदी अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आले होते.

हेही वाचा – चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; आशिषकुमार सिंह यांची वित्त विभागात नियुक्ती

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सरकारने बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे नजीकच्या आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. डॉ. कल्याणकर यांच्या बदलीनंतर आता रायगड जिल्हाधिकारीपदी कुणाची वर्णी लागणार याची अधिकारी वर्तुळात उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -