Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Ajit Pawar : मला महाराष्ट्रातील राजकारणात रस, नाराज नाही ; अजित पवारांची...

Ajit Pawar : मला महाराष्ट्रातील राजकारणात रस, नाराज नाही ; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवारांना यामधून डावलण्यात आलं. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. यावेळी अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मला महाराष्ट्रातील राजकारणात रस नाही आणि मी नाराज नाही, अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

मला महाराष्ट्रातील राजकारणात रस

माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी योग्यपणे पार पाडतोय. मला महाराष्ट्रातील राजकारणात रस आहे, हे प्रत्येक वेळेस मी सांगत आलोय. तसेच मी या निर्णयानंतर नाराज नाही, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

याबाबत सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे. कार्यक्रमात मला दोन वाजले होते आणि माझं फ्लाइट चार वाजताचं होतं. त्यामुळे मला येथून ताबोडतोब निघणं गरजेचं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक कमिटी केलेली होती, त्यामध्ये १५ ते १७ जणांचा समावेश होता. त्यावेळी आम्ही दोन निर्णय घेतले होते. पवार साहेबांनी राजीनामा मागे घेऊन कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची निवड करावी, असं सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव सुचवलं –  शरद पवार

- Advertisement -

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.पुढील पक्षाध्यक्ष कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर शरद पवार म्हणाले की, लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आले आहे. इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता. अजित पवारांनीच सुप्रिया सुळे यांचं नाव सुचवलं होतं. सध्या पक्षाध्यक्षाची जागा खाली नाही. जेव्हा खाली होईल तेव्हा बघू. परंतु अजित पवार नाराज असल्याची बातमी खरी नाही, असं शरद पवार म्हणाले.

कार्यकर्ता, पदाधिकारी ध्येयाने काम करतील –  अजित पवार

शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन, असं ट्वीट अजित पवारांनी केलं आहे.


हेही वाचा : Sharad Pawar : अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव सुचवलं, नाराजीचा प्रश्नच नाही – शरद


 

- Advertisment -