घरमहाराष्ट्रकाय रे तिचं नाव...; अजितदादांना आठवेना गौतमी पाटील

काय रे तिचं नाव…; अजितदादांना आठवेना गौतमी पाटील

Subscribe

 

बारामतीः विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बोलण्यात आणि भाषणात कोणीच हात पकडू शकत नाही. सहज बोलता बोलता ते कधी टोला मारून जातील हे कळणार पण नाही. अशा अजित दादांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना गौतमी पाटीलची आठवण आली. काय रे तिचं नाव, असे भाषण करत असताना अजित पवार यांनी विचारलं. त्यांना मागून कोणीतरी सांगितलं की, गौतमी पाटील… त्यावर अजित दादा म्हणाले, गौतमी…

- Advertisement -

बारामती येथे अजित पवार हे कार्यकर्त्यांना भाषण करत असताना मध्येच लग्न आणि यात्रेचा संदर्भ आला.  लग्नाची तारीख आहे की नाही, त्या दिवशी मला माहित नाही. यात्रा असेल तर रात्री…रात्री कापा-कापीच…रात्री तमाशा… मग यात्रेला पाटीलबाईला बोलवायचं का? असं अजित दादांनी विचारतचा एकच हश्शा पिकला.

नंतर दादांनी विचारलं, काय रे तिंच नाव… त्यावर मागून कोणी तरी सांगितलं की गौतमी पाटली… मग दादा म्हणाले, गौतमी… मी मध्यंतरी काहीतरी तिला बोललो, त्यानंतर ती म्हणाली, दादांनी मला असं सागितलं. त्यामुळे सर्वाना पाहता येईल असं काम प्रत्येकाने करायला हवं, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

- Advertisement -

अश्लिल नृत्यावरुन अजित पवार यांनी गौतमी पाटीलची चांगलीच कानउघडणी केली होती. लावणी महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. आपल्या वडीलधाऱ्यांनी पहिल्यापासूनच एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचे वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. लावणीचे सर्व कार्यक्रम सर्वानाच पाहता आले पाहिजे. त्यामुळे असे प्रकार व्हायला नकोत, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला होता.  त्यांनतर गौतमी पाटलीने अजित दादांची जाहिर माफी मागितली होती. पुन्हा अश्लिल नृत्य करणार नाही, अशी हमी तिने दिली होती. माझे अश्लिल नृत्य वारंवार शेअर करुन मला ट्रोल करु नका, अशी विनंतीही गौतमी पाटीलने केली होती. आता अजित दादांनाच गौतमीची आठवणी झाल्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -